Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता

गणपती आगमनासह विसर्जन सोहळ्याच्यावेळी दिसणाऱ्या भव्य मिरवणुका ढोल पथक, लेझीमची मिळणारी साथ यंदा पाहायला मिळणार (Dhol Tasha Pathak Affect Due To Covid) नाही.

Ganeshotsava | गणेशोत्सवात ढोल-ताशाचा गजरही बंद, पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिंता
फोटो - प्रातिनिधीक
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 3:52 PM

मुंबई : कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन (Dhol Tasha Pathak Affect Due To Covid) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे गणपती आगमनासह विसर्जन सोहळ्याच्यावेळी दिसणाऱ्या भव्य मिरवणुका ढोल पथक, लेझीमची मिळणारी साथ यंदा पाहायला मिळणार नाही. कोरोनाचा ढोल-ताशा पथकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

कोरोनामुळे मुंबई-पुण्यातील बहुतांश सार्वजनिक गणपती मंडळे यावर्षी साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत. याचा फटका अनेक घटकांना बसत आहे. तसाच तो डबेवालांच्या ढोल पथकांना बसला आहे. मुंबईत डबेवाल्यांची अनेक ढोल पथके कार्यरत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गणपती उत्सवात मुंबई पुण्यात ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. एकीकडे लॉकडाऊन आणि कोरोनामुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यातच आता गणपतीत देखील ढोल पथकांची आर्थिक घडी विस्कटणार (Dhol Tasha Pathak Affect Due To Covid) आहे.

गणपती उत्सवात ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे दोन तास ढोल वाजवण्याचे 15 ते 20 हजार रुपये बिदागी या मंडळींना मिळते. त्यामुळे या दिवसात प्रत्येक ढोल पथकाची लाखो रूपये कमाई होते. मात्र कोरोनामुळे या कमाईला आता मुकावे लागणार आहे.

मुंबई, पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव असला की डबेवाल्यांच्या ढोल पथकांना चांगली बिगादी मिळते. पण ती बिदागी आता मिळणार नाही. पुणे जिल्ह्यातील मावळ पट्यात ढोल पथके मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या विशिष्ट वाजवण्याच्या पध्दतीमुळे त्यांना पुणेरी ढोल म्हणतात. या पुणेरी ढोलांना गणपतीत मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे ढोलपथकांचे आर्थिक घडी विस्कटणार (Dhol Tasha Pathak Affect Due To Covid) आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Update | राज्यात तीन दिवसात 25 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

“डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका”, नगरपालिकेची अनोखी जाहिरात

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.