BREAKING : एकनाथ शिंदेंना परत येण्याच्या विनवणी करणाऱ्या दिपाली सय्यद ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण

शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

BREAKING : एकनाथ शिंदेंना परत येण्याच्या विनवणी करणाऱ्या दिपाली सय्यद 'वर्षा' निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 6:30 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कधी काय घडेल, याचा काहीच अंदाज नाही. कारण शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyad) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. दिपाली सय्यद आज अचानक वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेत तीन महिन्यांपूर्वी मोठं खिंडार पडलं होतं. एकनाथ शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले होते. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांना परत येण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याबाबत ट्विटरवर केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली होती. एवढ्या सगळ्या घडामोडींनंतर दिपाली एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दिपाली सय्यद या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे दिपाली सय्यद या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दिपाली सय्यद यांनी अनेकदा ठाकरे-शिंदे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. दिपाली यांनी सोशय मीडिया, प्रसारमाध्यमांसमोर येत एकनाथ शिंदे यांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं होतं. पण आता दिपाली सय्यद याच एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

दिपाली सय्यद नेमकं कोणत्या कारणास्तव एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्या होत्या, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण दिपाली यांनी दिवाळी निमित्ताने आपण मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिपाली यांनी सदिच्छा भेटीचं कारण दिलं असलं तरी पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत असण्याची शक्यता आहे. दिपाली शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.