VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!

दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही. बदनाम केलं जातंय. पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे. मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा सवाल त्यांनी केला. शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही, असा दावाही केला.

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!
दिशा सालियानच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:10 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या साऱ्या प्रकाराला दिशाचे कुटुंबीय कंटाळले असून, तिच्या आईने तर आम्हाली जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा, अशी अर्त विनवणी केलीय.

काय म्हणाली दिशाची आई?

दिशा सालियानच्या आई वासंती सालियान म्हणाल्या की, दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे आम्हाला त्रास होत आहे. दोन वर्षांनंतर सर्व केस बंद झाली होती. मात्र, आता पुन्हा हे सुरू झाले आहे. याचा आम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला सुद्धा आता जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं तर याला हे लोक जबाबदार असतील. आम्हाला बाहेर ही जाता येत नाही. आता आम्हाला जगू द्या, अशी आर्त विनवणी त्यांनी केली.

दिशाने का केली आत्महत्या?

दिशा सालियानच्या आई वसंती सालियानची आई वासंती सालियान पुढे म्हणाल्या की, हे लोक आम्हाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करत आहोत. असं काही झालं नाही. फक्त आमच्या मुलीला बदनाम केलं जात आहे. तर दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही. ऑफिसच्या कामाचं ताण होता. यामुळे तिने आत्महत्या केली. जे काही बोललं जातंय, अपघाती मृत्यय झाला, हे सगळं खोटं आहे. बदनाम केलं जातंय. पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे. मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा सवाल त्यांनी केला. शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही, असा दावाही केला.

संबंधित बातम्या :

सुशांतसिंग, दिशा सालियान प्रकरणात महापौरांचं राज्य महिला आयोगाला पत्र, मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल देण्याचे आदेश

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू; वाढदिवशी फोटो होतोय ट्रेंड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.