हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका; महापौर किशोरी पेडणेकर यांनी फटकारलं
हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपला (bjp) चांगलेच फटकारले आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं.
मुंबई: हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपला (bjp) चांगलेच फटकारले आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारं हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला सुनावले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाबत काही तक्रारी होत्या. केंद्र सरकारनेही सांगितलं होतं. पालिकेने यापूर्वीही राणेंना तसं कळवलं होतं हे राणेंनीच सांगितलं आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी त्यांचे काम करत आहेत. राणे त्यांना मदत करतील अशी अपेक्षा आहे, असंही महापौरांनी सांगितलं. किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नारायण राणे यांच्या बंगल्यात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचं केंद्राने सांगितलं होतं. महापालिकेची टीम पहिल्यांदाच राणेंच्या बंगल्यावर गेली नाही. बंगल्यातील काही पोर्शनमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते पाहणी करायला गेले आहेत. राणे त्यांना सहकार्य करतील ही अपेक्षा आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
मी सुद्धा एक आई आहे
यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केलं. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे एखाद्या मुलीबाबत बातमी देताना काळजी घ्या. दिशा सालियनच्या आईनेही या संदर्भात माहिती दिली आहे. गेलेल्या मुलीचं चारित्र्यहनन करायला नको. दोषी असतील तर नक्की कारवाई होणार. पण गेलेल्या मुलीबद्दल इतकं नका बोलू. तिचे आई वडीलही इतकी विनंती करत आहेत, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. महिला आयोगाला जाऊन सांगायची गरज नाही. त्यांना मेलवर पत्र जाईल. रुपाली पाटणकर सक्षम आहेत. त्या नक्कीच चौकशी करतील. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. कारण नसतात त्या मुलीचं नाव घेऊन काही जण त्या मुलीच्या आई-वडिलांना यातना देत आहेत. असं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
गीता पठणाचा प्रस्तावच आला नाही
यावेळी गीता पठणाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला फटकारले. आपल्याकडे गीता पठणाचा कोणताही प्रस्ताव आलाच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लहान मुलांमध्ये राजकारण नेणं अयोग्य आहे. भाजपच्या नगरसेविकेने मला पालिकेच्या एका पॅसेजमध्ये गीतेची प्रत दिली. ती मी घेतली आणि घरी घेऊन आले. पण त्यांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 21 February 2022 pic.twitter.com/rHuxIwWrsQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2022
संबंधित बातम्या:
चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस
आमदार कांदेंचा भुजबळांना पुन्हा धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये राष्ट्रवादीला सुरूंग
Maharashtra News Live Update : सरकार सूडाचं राजकारण करतंय, फडणवीसांचा औरंगाबादेत आरोप