Video | कँटिनमध्ये वेटर म्हणाला, माझे डोळे दुखतात; तात्याराव लहानेंकडून चहा पिता पिता प्रॉब्लेम सॉल्व्ह

मुंबई : जागतिक दर्जाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांची ख्याती आणि किर्ती सर्वांनाच माहिती आहे. एक लाख 60 हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. रुग्ण बरा होण्यासाठीची डॉ. लहाने यांची धडपड आपण अनेकवेळा पाहिलेली आहे. त्याचे अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळाच्या आवरात असलेल्या […]

Video | कँटिनमध्ये वेटर म्हणाला, माझे डोळे दुखतात; तात्याराव लहानेंकडून चहा पिता पिता प्रॉब्लेम सॉल्व्ह
डॉ. तात्याराव लहाने रुग्णांना तपासताना.
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 5:54 PM

मुंबई : जागतिक दर्जाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांची ख्याती आणि किर्ती सर्वांनाच माहिती आहे. एक लाख 60 हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. रुग्ण बरा होण्यासाठीची डॉ. लहाने यांची धडपड आपण अनेकवेळा पाहिलेली आहे. त्याचे अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळाच्या आवरात असलेल्या भोजनालयात चहा घेत पाहायला मिळाला. (Dr. Tatyarao Lahane checking eye of patients in Vidhan bhavan video gone viral)

डॉ. तात्याराव लहाने चहा घेण्यासाठी गेले आणि…

डॉ. तात्याराव लहाने हे राज्याच्या डीएमईआर विभागाचे संचालक आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे त्यांना कामाच्या निमित्ताने अनेकवेळा विधिमंडळात यावे लागते. त्यांच्यासोबत नेहमीच फायलींचा गठ्ठा असतो. आज थोडी उसंत मिळाल्यामुळे तसेच पुढील कामाचा आढावा घेण्यासाठी ते विधीमंडळाच्या आवारात असलेल्या कँटीनमध्ये पोहोचले. यावेळी समोर तात्याराव लहाने समोर बसलेले बघितल्यानंतर एका वेटरने त्यांना चहा आणून दिला. आणि लगेच तात्याराव यांना त्याच्या डोळ्या संदर्भातल्या समस्या सांगितल्या.

….आणि कँटिनचे रुपांतर रुग्णालयात झाले

यावेळी तात्याराव यांनी सगळा शिण बाजूला ठेवून तिथेच खिशातला मोबाईल काढला आणि मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात त्या वेटरचे डोळे तपासले. त्यांनी त्या वेटरला काही औषधी लिहून दिल्या. त्यानंतर तात्याराव लहाने उपचार करत असताना दिसल्यावर काही क्षणांत तिथे कँटिनमध्ये काम करणारे इतर वेटरही जमा झाले. त्यांनीसुद्धा लहाने यांना आपल्या डोळ्यांच्या समस्या सांगितल्या. आपल्यासमोर झालेली गर्दी लक्षात येताच त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता; टेबलवर ठेवलेला फाईलीचा गठ्ठा बाजूला सारला. तिथेच लहाने यांनी सर्वांना तपासायला सुरू केले आणि बघता बघता विधिमंढळातील कँटिनचे रुपांतर ओपीडी विभागात झाले.

दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने यांच्या आपल्या समर्पणाची पुन्हा एकदा प्रचिती येथे आली. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

डॉ. तात्याराव लहाने विधिमंडळात रुग्णांना तपासताना, पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

International women’s day 2021 | गावाचा सगळा कारभार फक्त महिलांकडे; अहमदनगरच्या ‘या’ गावाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा

Maharashtra Budget 2021 LIVE Updates | कोरोनाचं संकट, पण रडगाणं न गाता सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मुख्यमंत्री

Chandrakant Patil | …तर मराठा आरक्षण सरकार टिकवू शकेल – चंद्रकांत पाटील

(Dr. Tatyarao Lahane checking eye of patients in Vidhan bhavan video gone viral)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.