मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचे अमली पदार्थ जप्त

या दोघांना 4 जानेवारीपर्यंत क्राईम ब्राँच कोठडीत ठेवण्यात येणार आहे. (Drugs confiscated By Mumbai Crime Branch) 

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचे अमली पदार्थ जप्त
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 10:19 PM

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने नववर्षाच्या सुरुवातीलाच दोन मोठ्या कारवाई केली आहे. शुक्रवारी (1 जानेवारी) मुंबई क्राईम ब्राँचने विक्रीस बंदी असलेले तंबाखूजन्य उत्पादक जप्त केले आहे. याची किंमत 1 कोटी 2 लाखांच्या आसपास आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना 4 जानेवारीपर्यंत क्राईम ब्राँच कोठडीत ठेवण्यात येणार आहे. (Drugs confiscated By Mumbai Crime Branch)

गेल्या काही दिवसांपासून  NCB च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्समाफिया विरोधात मोहीम सुरु केली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री आणि नववर्षाच्या सुरुवातीला सर्व मुंबईकर जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात रमले होते. मात्र त्यावेळी एनसीबी अधिकारी ड्रग्स पेडलर्स आणि माफियांच्या शोधात होते.

100 ग्रॅम मेफेड्रॉन आणि एक किलो नशेच्या गोळ्या जप्त 

शुक्रवारी (1 जानेवारी) NCB च्या अधिकाऱ्यांना काही खात्रीलायक सूत्रांनी गुप्त माहिती दिली होती. या माहितीद्वारे मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी करत NCB ने 100 ग्रॅम मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आणि जवळपास एक किलो नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने केलेल्या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा भाग आहेत. हे सर्वजण मुंबईतील कुर्ला, अंधेरी, वर्सोवा आणि नवी मुंबई या भागात सक्रीय होते. या टोळीतील मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

या सर्व ड्रग्ज माफियाचा मास्टरमाईंड हा अब्दुल करीम शेख उर्फ अनवर लाला उर्फ करीम लाला असल्याचे बोललं जात आहे. करीम लाला हा एम डी ड्रग्सचा मोठा व्यापारी आहे. मुंबईतील पश्चिम उपनगर, ठाणे इत्यादी ठिकाणी तो एमडी सप्लाय करतो. मेफेड्रॉन हे सिंथेटिक सायकोएक्टिव ड्रग आहे. याला M-cat किंवा व्हाईट मॅजिक या नावानेही ओळखले जाते. हे ड्रग्ज विविध मोठ्या पार्ट्यांमध्ये वापरले जाते.

दरम्यान मुंबई पोलिसांनी गेल्या आठव़ड्यात शनिवारी एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडून 30 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. आरोपी महिला ही तिच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत 3 बॅगा भरुन 30 किलो गांजा घेऊन जात होती. त्यावेळी जे.जे. जक्ंशन या ठिकाणी असलेल्या नाईट कर्फ्यूदरम्यान तपासणी केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. (Drugs confiscated By Mumbai Crime Branch)

संबंधित बातम्या : 

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त; थर्टीफर्स्टच्या रात्री 1.78 कोटींच्या सोन्याची लूट; अहमदाबाद हादरले!

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.