AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22000 हजार कोटींचा घोटाळा, सुप्रसिद्ध ओमकार ग्रुपच्या अध्यक्ष आणि संचालकांना ईडीकडून अटक

मुंबईच्या सुप्रसिद्ध आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या ओमकार ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे.

22000 हजार कोटींचा घोटाळा, सुप्रसिद्ध ओमकार ग्रुपच्या अध्यक्ष आणि संचालकांना ईडीकडून अटक
| Updated on: Jan 28, 2021 | 8:41 PM
Share

मुंबई : मुंबईच्या सुप्रसिद्ध आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या ओमकार ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना ईडीने (Enforcement Directorate) अटक केली आहे. या दोघांना शनिवारपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्यात येणार आहे. (ED arrested chairman and Managing director of Omkar builders for Rs 22,000 crore SRA fraud case)

अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार बिल्डर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22 हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून 450 कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे.

दरम्यान, ओमकार ग्रुपने 22 हजार कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आकडा नाकारला आहे. औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेत (ईडब्ल्यू) दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित 410 कोटी रुपयांच्या एफआयआरशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी आणि बुधवारी इडीने ओमकार ग्रुपच्या 10 जागांवर छापा टाकला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर संबंधित संस्थेची कार्यालये आणि गुप्ता-वर्मा यांच्या निवासस्थानांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराशी निगडित अनेक कागदपत्रे सापडली आहेत. 27 जानेवारी रोजी दुपारी बाबूलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांची ईडीमार्फत चौकशी केली गेली. सूत्रांनी सांगितले की, दोघेही तपासात सहकार्य करत नव्हते, त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा घोटाळा केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

ओमकार ग्रुपच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विकासासाठी लेटर ऑफ इंटेन्ट (एलओआय) मिळवण्यास मदत केल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. या एलओआयचा उपयोग विविध बँकांकडून सुमारे 22,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही केला गेला आहे. मुंबईतील सर्वात मोठी रिअल इस्टेट संस्था ओमकार ग्रुप ही मुंबई उपनगरातील प्रिमियम रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये काम करते. ही संस्था वरळी येथील प्रतिष्ठित ओमकार 1973 प्रोजेक्टसाठी ओळखले जाते. या इमारतीत अनेक बड्या व्यक्तिंनी फ्लॅट विकत घेतले आहेत. ओमकार ग्रुप ही एसआरए प्रकल्पातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी आहे.

ओमकार बिल्डरविरोधात तक्रार करणाऱ्या महेंद्र सुराना यांचे वकील यश आनंद सिंह यांचा दावा आहे की, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच हा एकूण 22 हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

हेही वाचा

सेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला!

डांबून ठेवले, चाकूचा धाक दाखवला; आजोबांची आजीविरोधात पोलिसात धाव

(ED arrested chairman and Managing director of Omkar builders for Rs 22,000 crore SRA fraud case)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.