ED हे भाजपचं घाबरविण्याचं तंत्र; Nana Patole यांचा सतीश उके अटक प्रकरणी घणाघात
ईडीनं सतीश उके यांना अटक करून मुंबईला रवाना केले. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, भाजपची व्यवस्था ही अत्याचारी आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोललं की, ईडी मागे लावली जाते. लोकांना घाबरविण्याचं ईडी हे तंत्र आहे.
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) यांना काल ईडीनं अटक केली. उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शिवाय नाना पटोले यांच्याकडून ते खटला लढत होते. त्यामुळं सतीश उके यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सतीश उके यांची काल सकाळी पाच तास त्यांच्या राहत्या घरी नागपूर येथे चौकशी करण्यात आली. त्यानंतर उके यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. त्यानंतर ईडीनं सतीश उके यांना अटक करून मुंबईला रवाना केले. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, भाजपची व्यवस्था ही अत्याचारी आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोललं की, ईडी मागे लावली जाते. लोकांना घाबरविण्याचं ईडी हे तंत्र आहे.
विरोधी पक्षातील लोकांना घाबरविलं जाते
पटोले म्हणाले, सतीश उके हे माझे वकील होते. याचा अर्थ त्यांनी काही केलं असेल, तर त्याच्याशी माझा संबंध लावणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी या प्रकरणी सुमोटो कारवाई करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. तसेच ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवलं जात असल्याचंही ते म्हणाले.
उके माझे वकील नातेवाईक नाहीत
कालच्या कारवाईनंतर आज नाना पटोले हे नागपूर दौऱ्यावर आहेत. हा माझा नियोजित दौरा असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. उके माझे वकील होते. नातेवाईक नाही, असंही पटोले यांनी स्पष्ट केलंय. भाजप सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केलाय.