AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस

ईडी'ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. | Eknath Khadse

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना 'ईडी'कडून चौकशीची नोटीस
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 25, 2020 | 10:20 PM
Share

मुंबई: भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP leader) दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे समजत आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (ED issues summons to NCP leader Eknath Khadse)

मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यावरुन भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपकडून सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि अमोल मिटकरी यांनी केला. परंतु, एकनाथ खडसे भक्कम आहेत, ते भाजपला पुरुन उरतील, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या किल्ल्याला खिंडार पडण्यास सुरुवात झाली होती. याशिवाय, एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

Eknath Khadse | त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

(ED issues summons to NCP leader Eknath Khadse)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...