खडसेंच्या चौकशीपूर्वी ईडीकडून ‘जमावाजमव’; आता अंजली दमानियांकडूनही घेणार माहिती

आता दमानिया ईडीच्या अधिकाऱ्यांना काय माहिती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. | Khadse case

खडसेंच्या चौकशीपूर्वी ईडीकडून 'जमावाजमव'; आता अंजली दमानियांकडूनही घेणार माहिती
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 2:40 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या चौकशीपूर्वी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) माहितीची जोरदार जमवाजमव सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ‘ईडी’चे अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचार आणि मानहानीकारक शेरेबाजी केल्याचा आरोप केले होते. (ED officials will meet Anjali Damania before NCP leader Eknath Khadse’s probe)

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अंजली दमानिया यांनी आपल्याकडे एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही केला होता. त्यामुळे आता दमानिया ईडीच्या अधिकाऱ्यांना काय माहिती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता ‘ईडी’चे अधिकारी अंजली दमानिया यांना भेटणार असल्याचे कळते.

तत्पूर्वी अंजली दमानिया यांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषेदवर नियुक्ती करु नये, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रही लिहले होते. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार करु नये, असे दमानिया यांनी पत्रात म्हटले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांचा खडसेंच्या वकिलांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) केस प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अधिकाऱ्यांनी अ‌ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी ईडीकडून फोन आल्याची माहिती आहे.

अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत. असीम सरोदे यांच्याकडून दोन हजार पानांची माहिती ईडीला दिली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी 30 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका; दमानिया यांचं राज्यपालांना साकडं

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा

इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत

(ED officials will meet Anjali Damania before NCP leader Eknath Khadse’s probe)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.