ED : आता नंबर कुणाचा..? गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी मुंबईत ईडीची छापेमारी सुरु

गोरेगाव पत्राचाळीतील जमिन घोटाळा प्रकरण आणखी किती जणांसाठी डोकेदुखी ठरणार हे आता काळच ठरवणार आहे. संजय राऊताांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारीला सुरवात केली आहे. ईडीचे लोकेशन समजू शकले नसले तरी राऊतांनंतर आता कारवाई कुणावर होणार हे पहावे लागणार आहे.

ED : आता नंबर कुणाचा..? गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी मुंबईत ईडीची छापेमारी सुरु
ईडी कार्यालयाकडून मुंबईत छापेमारीला सुरवात झाली आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 4:41 PM

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ (land scam) जमिन घोटाळा प्रकरण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी (Sanjay Raut) शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. असे असतानाच दुसरीकडे (ED Office) ईडीच्या कार्यालयाकडून मुंबईत आणखी काही ठिकाणी छापेमारीला सुरवात केली आहे. या जमिन घोटाळा प्रकरणी काही नगरसेवकांची नावेही समोर आली होती, त्या अनुशंगाने आता पुढील तपास सुरु झाला आहे का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही छापेमारी मुंबईच सुरु असल्याने यामध्ये आणखी कुणाचे हात अडकले आहेत का हे पहावे लागणार आहे. मात्र, जमिन घोटाळा प्रकरणाची चौकशीची सुरवात ही संजय राऊत यांच्यापासून झाली असून ते ईडीच्या ताब्यात आहेत.

ईडीचे लोकशन नेमके कोणते?

गोरेगाव पत्राचाळीतील जमिन घोटाळा प्रकरण आणखी किती जणांसाठी डोकेदुखी ठरणार हे आता काळच ठरवणार आहे. संजय राऊताांची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारीला सुरवात केली आहे. ईडीचे लोकेशन समजू शकले नसले तरी राऊतांनंतर आता कारवाई कुणावर होणार हे पहावे लागणार आहे. मध्यंतरी याप्ररकरणी काही नगरसेवकांची देखील नावे समोर आली होती. त्यानुसार ही छापेमारी सुरु झाली का हे पहावे लागणार आहे. मुंबईतील काही ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. ईडीचे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने मुंबईतील दोन ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केले होते. यामध्ये काही महत्वाची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागलेली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीकडून छापेमारी सुरु झालीी आहे. यामध्ये काय माहिती समोर येते आणि यामध्ये आणखी कोणाचा समावेश असणार हे देखील समजले जाईल. परंतु, बुधवारी दुपारपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नव्हती.

संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत

पत्राचाळ जमिन घोटाळा प्रकरणी चौकशीअंती खा. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. असे असतानाच ईडीकडून आणखी काही ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आल्याने राऊतांच्या अडचणीत वाढ होईल असे बोलले जात आहे. न्यायालयीन को़ठडी संपताच पुन्हा त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जाऊ शकते. जोपर्यंत जामिनावर काही निर्णय होत नाही तोपर्यंत राऊतांच्या अडचणीत वाढ ही ठरलेली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.