अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ मुलालाही समन्स, ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय.

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ मुलालाही समन्स, ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:09 AM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. त्यांना मंगळवारी (6 जुलै रोजी) चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना पाठवण्यात आलेलं हे पहिलं समन्स आहे (ED summons Rushikesh Deshmukh son of Anil Deshmukh in money laundering case).

अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स आल्यानं चर्चांना उधाण आलंय. अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै, तर अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.

“मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात”

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचमुळे त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.”

अनिल देशमुख प्रकरणात 26 जूनला नेमकं काय-काय घडलं?

ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर काल दुपारी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली.

25 जूनला काय-काय घडलं?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई केली. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला.

हेही वाचा :

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, हजर राहण्याचे आदेश; देशमुख दिल्लीला रवाना?

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, देशमुखांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

VIDEO: देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

व्हिडीओ पाहा :

ED summons Rushikesh Deshmukh son of Anil Deshmukh in money laundering case

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.