Bird Flu | मुंबईकर बर्ड फ्लूने धास्तावले, ग्राहकांअभावी अंड्यांचे दर घसरले

मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन आज 5 रुपयांवर घसरले आहेत.

Bird Flu | मुंबईकर बर्ड फ्लूने धास्तावले, ग्राहकांअभावी अंड्यांचे दर घसरले
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 3:47 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनासोबतच आता आणखी एका आजाराचं सावट आहे (Eggs Rate Drop). राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू (Bird Flu) या आजाराने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच आता मुंबईतील नागरीकांमध्ये बर्ड फ्ल्युची भीती पसरली आहे (Eggs Rate Drop).

या भीतीचा थेट चिकन आणि अंड्यांवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरुन आज 5 रुपयांवर घसरले आहेत. तर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडा बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची भीती अंडा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

आज सकाळपासून एकही ग्राहक दुकानावर आला नसल्याची खंत अंडा विक्रेत्यांनी केली आहे. मात्र, नागरीकांनी घाबरु नये अशी विनंती दुकानदारांनी केली आहे.

मात्र, बर्ड फ्ल्यूची भीती असल्याने नागरीक धास्तावले आहेत. सरकारने मार्गदर्शन करण्याची विनंती विक्रेत्यांची केली आहे.

परभणीत संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणी जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहेत. मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारुन जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे (Eggs Rate Drop).

‘चिकन किंवा अंडी खाल्ल्याने माणसांना बर्ड फ्लू होत नाही’

चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना अजिबातच होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. फक्त चिकन आणि अंडी पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत, असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली.

Eggs Rate Drop

संबंधित बातम्या :

Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अ‍ॅलर्ट

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

 बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.