आठ कुत्र्यांवर विषप्रयोग, 22 पिल्लांना झाडीत फेकलं, विरारमधील संतापजनक प्रकार

विरारच्या म्हाडा कॉलनीमध्ये कुत्र्याच्या आठ पिल्लांना विष देऊन मारल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. इतकंच नाही तर कुत्र्याच्या 22 पिल्लांना झाडा-झुडुपांत फेकून देण्यात आलं.

आठ कुत्र्यांवर विषप्रयोग, 22 पिल्लांना झाडीत फेकलं, विरारमधील संतापजनक प्रकार
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 4:10 PM

नालासोपारा : विरारच्या म्हाडा कॉलनीमध्ये कुत्र्याच्या आठ पिल्लांना विष देऊन मारल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. इतकंच नाही तर कुत्र्याच्या 22 पिल्लांना झाडा-झुडुपांत फेकून देण्यात आलं (Puppies Poisoned). या प्रकरणी तिघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Puppies Poisoned).

म्हाडा कॉलनी परिसरात कुत्र्याच्या आठ पिल्लांचा मृत्यू, तर 22 च्यावर कुत्र्याचे पिल्लं बेपत्ता असल्याची माहिती बुधवारी (29 जानेवारी) कुणाल घाटे या व्यक्तीने भारतीय पशु कल्याण मंडळाच्या पालघर जिल्हा अधिकारी मितेश जैन यांना दिली होती. मिळालेल्या माहितीवरुन मितेश जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे त्यांनी कुत्र्याची आठ पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. तर 22 पिल्लं ही बाजूच्या झाडा-झुडुपांमध्ये फेकून दिल्याचं त्यांना समजले. जैन यांनी त्या 22 पिल्लांना शोधलं. या पिल्लांपैकी तीन पिल्लं जखमी अवस्थेत त्यांना आढळून आली. त्यांनी तात्काळ विरार येथील करूणा ट्रस्टच्या डॉक्टरांना बोलावून या जखमी पिल्लांवर उपचार करण्यात आले. सध्या या पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

त्यानंतर मितेश जैन आणि त्यांच्या डॉक्टरने तेथील सफाई कर्मचारी आणि वॉचमनला या प्रकरणाबाबत विचारणा केली. तेव्हा म्हाडा कॉलनीतील एका शिक्षकाच्या सांगण्यावरुन हे करण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं.

या प्रकरणी अर्नाळा पोलिसांत भोला शास्त्री (सफाई कामगार), पप्पू पासवान (वॉचमन), रवी वर्मा (वॉचमन) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते विरार पश्चिम म्हाडा बिल्डिंग नंबर 13 मध्ये कार्यरत आहेत. या तिघांवर भादवी 428, 429, 34 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 (1)(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.