Eknath Shinde : पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट, रामायण महाभारत कुणी घडवलं?

आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागयचो. मात्र मधली लोक दादा देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असा आरोप गोगावले यांनी केला. त्याचवेळी  शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांही फोनवर आल्या, त्यांनी गोगावलेंना एकच सवाल केला.

Eknath Shinde  : पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट, रामायण महाभारत कुणी घडवलं?
पेडणेकरांचा आवाज एकताच गोगावलेंकडून फोन कट,Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:35 PM

मुंबई : काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत बंडखोर आमदारांना आज पहिल्यांदा थेट इशारा दिला. माझ्या फोटोशिवाय आणि शिवसेनेच्या नावाशिवाय जगून दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde) दिलं. तसेच माझ्याकडची खातीही तुम्हीला दिली, राठोडांवर आरोप होऊनही संभाळून घेतलं म्हणत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र त्यावर आता लगेच आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतिक्रिया आली. साहेब मुख्यमंत्री झाल्याननंतर जी काही दरी निर्माण झाली. त्यावेळी कोणतर हवं होतं. आदित्यही गुंतून गेले. हेही गुंतून गेले, आम्ही लोकांच्या अडचणीसाठी वेळ मागयचो. मात्र मधली लोक दादा देत नव्हती. त्यामुळे हे झालं, असा आरोप गोगावले यांनी केला. त्याचवेळी  शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांही फोनवर आल्या, त्यांनी गोगावलेंना एकच सवाल केला. तर गोगावलेंना किशोरी पेडणेकरांचा आवाज ऐकताच थेट फोनच कट केला.

कोणत्या प्रश्नावर फोन कट केला?

मधल्या लोकांमुळे एवढं सगळं रामायण महाभारत घडलं, असे गोगावले म्हणत होते. मात्र त्याचवेळी किशोरी पेडणेकर हा संवाद फोनवर ऐकत होत्या. त्यांना गोगावलेंना पहिलाच सवाल हे रामायण महाभारत कोणी केलं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर गोगावलेंनी प्रतिक्रिया देण्याचं टाळत फोन ठेवला. तर संवाद नव्हता तर कॅबिनेटमध्ये काय होत होतं, आरोप करून भाजपबरोबर जायचंच ठरवलं आहे. पक्षप्रमुखावर अविश्वास दाखवायचाच आहे. मग कोण आहे यामागे? असा सवालही त्यानंतर पेडणेकरांनी गोगावलेंना केला.

गुवाहाटीला जाऊन बसाची वेळ का आली?

तसेच आम्ही संवाद एकनाथ शिंदे साहेबांशी करतोय. शिंदे साहेब खूपच दीर गंभीर शिवसेनेचे नेते आहेत. महिला आणि सर्वच एक वेगळ्या याने त्यांच्याकडे बघताय. म्हणे बंड नको, दोन आमदार निघून आले ते सांगत आहेत ना, काय पद्धतीने ते ठेवत आहेत, ते खरं असणार. उद्धवजी आहेत. ते मान सन्मान दिला आहे म्हणून तुम्हाला त्यांची खाती मिळाली. आम्ही विनवण्या केल्या. समजूत काढायचा प्रयत्न केला. ज्या गुजरातने तिरस्कार दाखवला. त्या गुजरातमध्ये का गेला. दोन हजार किलोमीटर लांब गुवाहाटीला जाऊन राहायची वेळ का आली. म्हणून साहेब हे बाळा बंड नको, बोलत आहेत. आता तुम्ही ज्या पक्षाबरोबर जोऊ इच्छिता त्या पक्षात सर्व अलबेल होणार आहे का? असा सवालही भाजपसोबत जाऊ इच्छिणाऱ्या शिंदेंना पडणेकरांना केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.