Eknath Shinde Corona: मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण, संपर्कातील सर्वांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन!
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत असून यावेळी राज्याचे मंत्री आणि राजकीय नेत्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
मुंबईः राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. नुकतीच त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील जवळपास 20 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त राजकीय नेते कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यात आज आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे.
एकनाथ शिंदेंचं ट्विट काय?
मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2022
पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची बाधा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची बाधा झाल्याचे उघडकीस आले. मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. यावर्षी पुन्हा त्यांना कोरोना झाला असून ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. पंकजा मुंडे यांची प्रकृती ठिक असून काळजी करण्यासारखं काही नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोहित पवारांनाही कोरोना
कोरोनाच्या या लाटेत राजकीय नेते आणि मंत्र्यांमध्ये कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली दिसून येत आहे. कालच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले. यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
इतर बातम्या-