शिंदे गटाची अनोखी शक्कल, सदस्य नोंदणीसाठी स्वयंचलित कॉलिंग यंत्रणा, फोन करताच मुख्यमंत्र्यांचा आवाज

शिंदे गटाने आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

शिंदे गटाची अनोखी शक्कल, सदस्य नोंदणीसाठी स्वयंचलित कॉलिंग यंत्रणा, फोन करताच मुख्यमंत्र्यांचा आवाज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 12:16 AM

मुंबई : आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाते. प्रत्येक पक्ष विविध माध्यमातून, वेगवेगळे उपक्रम राबवून पक्षाला बळकट करण्याचं काम करतो. या उपक्रम आणि प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळतं. तसाच काहीसा प्रयत्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जातोय. शिंदे गटाने आपल्या पक्षाला बळकट करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. शिंदे गटाने IVR अर्थात स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेच्या माध्यमातून सदस्य नोंदणीला सुरुवात केल आहे.

शिंदे गटात आता थेट मोबाईलद्वारे सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. सदस्य नोंदणीसाठी स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेद्वारे हा मेसेज पाठवला जातोय. नंबर डायल करताच शिंदेंचा आवाज येतोय आणि नोंदणीसाठी आवाहन केलं जातंय.

स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात?

या स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात, हे जाणून घेण्याबाबत अनेकांना उत्सुकता असेल. या फोन कॉलद्वारे एकनाथ शिंदे सर्वांना सदस्य नोंदणीसाठी आवाहन करत आहेत. “जय महाराष्ट्र! मी एकनाथ शिंदे बोलतोय. हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचललं आहे. सुजलाम, सुखलाम महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक 1 दाबा”, असं एकनाथ शिंदे बोलत असल्याचं कॉलमध्ये ऐकू येतं.

एकनाथ शिंदेंना याचा फायदा होईल?

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांना कदाचित चांगले यश प्राप्त होऊ शकतं. कारण सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नसेल. याशिवाय ते खर्चिक नाही. फक्त कॉल केला की लगेच एकनाथ शिंदे यांचा आवाज ऐकू येईल. त्यानंतर ते मार्गदर्शन करतील तशी सदस्य नोंदणी होईल. विशेष म्हणजे या माध्यमाचा शिंदे गटाला देखील फायदा होईल. कारण या फोन कॉलच्या माध्यमातून किती मोबाईल नंबरवरुन सदस्य नोंदणी झालीय याची खरी माहिती पुरावा म्हणून शिंदे गटाकडे राहील.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.