निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवार गटाची पहिल प्रतिक्रिया काय?
Election Commission Decision : निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला आहे. आता अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणार असून निकालावर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला गेलाय. आगामी निवडणुकांआधी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
मी फक्त खासदार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाही प्रणालीनुसार निवडणुक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. मला विश्वास आहे की अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांनी मिळून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या जनतेमधून उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. आज कायद्याने त्याची वैधता मिळाली याचं समाधान असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणुक आयोगाने बहुमताच्या आधारावर हा निकाल दिला आहे. निवडणुक आयोगासमोर आम्ही जे काही मुद्दे मांडले होते. कायदेशीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना यावर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याचं तटकरे म्हणाले. या निकालावर बोलताना शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.
या निकालाने मला फार आश्चर्य वाटत नाही. कारण ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली गेली त्या दिवशीच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पक्ष आणि चिन्ह तुमच्या ताब्यात देऊ याच अटीवर हे सर्व झालं आहे. आमचं चिन्ह हे शर पवारच असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणार आहेत. शरद पवार गटाने उद्यापर्यंत नवं नाव आणि चिन्हा न दिल्यास अपक्ष म्हटलं जाणार आहे. आता शरद पवारांची पुढची भूमिका काय असणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.