मुंबईत इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना, वाचा प्रदूषणमुक्त मुंबईचा नवा प्लॅन

महानगरपालिकेच्‍या (BMC) पर्यावरण विभाग अंतर्गत मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या कक्षाचा शुभारंभ राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्‍या हस्‍ते बुधवारी वाळकेश्‍वर येथील सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.

मुंबईत इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना, वाचा प्रदूषणमुक्त मुंबईचा नवा प्लॅन
आदित्य ठाकरेचा प्रदूषणमुक्तीचा नवा प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 8:54 PM

मुंबई : देशाला सध्या प्रदूषण विळखा घालत आहे. त्यामुळे मोठ्या शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ईलेक्ट्रीक वाहनांचा (E bus) वापर वाढवण्यावर भर आहे. मुंबईतही आता मोठ्या संख्येने इलेक्ट्रीक बस धावणार आहेत. त्यामुळे या क्षेत्राला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या (BMC) पर्यावरण विभाग अंतर्गत मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या कक्षाचा शुभारंभ राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्‍या हस्‍ते बुधवारी वाळकेश्‍वर येथील सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. मुंबई महानगरामध्‍ये विद्युत वाहनांचा वापर वाढीस लागावा, त्‍यातून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन उत्‍सर्जन कमी व्‍हावे, विद्युत वाहनांशी संबंधित विविध क्षेत्रातील भागधारकांना सहाय्य करावे, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातही इलेक्ट्रिक व्‍हेईकलचाच प्राधान्‍याने वापर व्‍हावा, यासाठी पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे प्रयत्‍नशील आहेत. त्‍यांच्‍या संकल्‍पनेनुसार महानगरपालिकेने मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाची स्‍थापना केली आहे. त्‍यासाठी वर्ल्‍ड रिसोर्सेस इंड‍िया (डब्‍ल्‍यूआरआय) यांचेही सहकार्य लाभले आहे.

नवा कक्ष काय काम करणार?

मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्षाच्‍या माध्‍यमातून शासकीय अधिकारी, ई – मोबिलिटी तज्‍ज्ञ, इलेक्ट्रिक व्‍हेईकल उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्‍याचे कार्य केले जाणार आहे. विद्युत वाहनांच्‍या प्रचारासाठी निर्णय घेण्‍यासाठी धोरणकर्त्‍यांना सहाय्य करणे, मुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्युत वाहनांच्‍या खरेदीसाठी सुलभरित्‍या कर्ज सुविधा उपलब्‍ध करुन देणे, वाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अंमलात आणणे, बेस्‍टच्‍या सहयोगाने इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार करणे, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणे, मुंबईत प्रायोगिक तत्‍त्‍वावर कामकाज करण्‍यासाठी इलेक्ट्रिक व्‍हेईकल क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती उपआयुक्‍त (पर्यावरण) सुनील गोडसे यांनी दिली आहे.

उद्घाटनाला कुणाची उपस्थिती असणार?

मुंबई इलेक्ट्रिक व्‍हेईकल कक्ष शुभारंभ प्रसंगी मुंबई शहर जिल्‍हा पालकमंत्री अस्‍लम शेख, राज्‍याचे पर्यावरण राज्‍यमंत्री संजय बनसोडे यांची विशेष उपस्थ‍िती राहणार आहे. मुंबईच्‍या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान भूषवतील. स्‍थानिक खासदार अरविंद सावंत, स्‍थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, उपमहापौर सुहास वाडकर, महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल, महानगरपालिकेचे सर्व गटनेते, वैधानिक व‍ विशेष समित्‍यांचे अध्‍यक्ष तसेच अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, बेस्‍टचे महाव्‍यवस्‍थापक लोकेश चंद्रा इत्‍यादी मान्‍यवरांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

मराठी भाषा दिनावरुन विनोद तावडेंचा शिवसेनेला टोला, तर राऊतांच्या भाषेमुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याची टीका

Maha-Infra Conclave: हित महाराष्ट्राचं!, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल?; ‘टीव्ही9 मराठीची उद्या कॉनक्लेव्ह’

ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....