मुंबईकरांच्या खिशाला कात्री? वीज बिलामध्ये 50 रुपयांच्या वाढीचा शॉक?

मुंबईकरांच्या वीज बिलात आता अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. Electricity bills increased in Mumbai

मुंबईकरांच्या खिशाला कात्री? वीज बिलामध्ये 50 रुपयांच्या वाढीचा शॉक?
वीज वाहिनी
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:59 PM

मुंबई: सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. वाढत्या महागाईच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना वाढत्या वीजबिलाचा शॉक बसणार आहे. मुंबईकरांच्या वीज बिलात आता अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. खारघर-विक्रोळीमध्ये नवीन वीज वाहिनी टाकली जात आहे. या वाहिनीच्या उभारणी खर्चापोटी अतिरिक्त पारेषण शुल्क आकारण्यास वीज नियामक आयोगानं याला मंजुरी दिली आहे. (Electricity bills  increased in Mumbai from next year)

वाढत्या वीजेच्या मागणीमुळे अतिरिक्त वीज वाहिन्यांची उभारणी

मुंबईला लागणाऱ्या वीजेची मागणी साधारणपणे 3500 मेगावॅटच्या जवळपास आहे. महापारेषण या राज्य सरकारच्या कंपनीकडून 2200 ते 2500 मेगावॅट वीज पुरवली जाते. आगामी काळातील वाढणाऱ्या वीजेची मागणी लक्षात घेता अतिरिक्त वीज वाहिनी उभारणीचं काम केलं जात आहे. यामध्ये 400 केव्ही क्षमतेच्या महत्वाच्या वाहिनीचा समावेश आहे. या वाहिनीच्या उभारणीसाठी खारघर-विक्रोळी ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनी स्थापन करण्यात आली होती. याकंपनीकडून हे काम अदानी ट्रान्समिशनला देण्यात आलं आहे. खारघर विक्रोळी वीज वाहिनी उभारणीच्या खर्चापोटी अतिरिक्त पारेषण शुल्क लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पुढील वर्षापासून अतिरिक्त पारेषण शुल्क द्यावं लागणार?

खारघर विक्रोळी पारेषण वाहिनीचे काम साधारणपणे मार्च 2022 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पारेषण शुल्क वसूल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वाहिनीचा उभारणी खर्च साधारणपणे 2200 कोटी रुपये आहे. तर एका वर्षात अतिरिक्त पारेषण शुल्कापोटी 250 कोटी रुपयांची वसुली होणार आहे.

बेस्टकडून ग्राहकांना 2 टक्के सवलत

बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वीजग्राहकाने नोव्हेंबर 2020 महिन्याचे वीजबिल तात्काळ भरले, त्याला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात 2 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. तर नोव्हेंबर महिन्यातील वीजबिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास त्या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाईल. या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर 1 टक्के सूट दिली जाईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

तब्बल 10 तासांनी भिवंडीतील आगीवर नियंत्रण, नुकसान किती?

मुंबई महापालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर घडणार, ऐतिहासिक वारसा उलगडणार

(Electricity bills increased in Mumbai from next year)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.