Sanjay Raut | भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | 'EVM है तो मोदी है', अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut | भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप
MP Sanjay Raut On Narendra Modi
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 10:59 AM

मुंबई | 31 January 2024 : मोदी सरकारवर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप पुन्हा सुरु केला आहे. ‘EVM है तो मोदी है’, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या चंदीगड पॅटर्नमधून या बाबीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ईव्हीएम घोटाळ्याविषयी यापूर्वी पण विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोग हा सरकारचा पोपट असल्याची घणाघाती टीका पण अनेकदा करण्यात आली आहे. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर तर मोदी सरकारवर टीकेला अधिक धार आली आहे.

ईव्हीएम तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात

यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली. लोकसभा 2024 निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नियोजनावर त्यांनी टीका केली. त्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

हे सुद्धा वाचा

सरळमार्गाने निवडणूक नाही जिंकणार

भाजप सरळ मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीत भाजप चंदीगड पॅटर्न आणू पाहत आहे. चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण रामभक्तांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि आप पक्षाची आठ मते अवैध ठरवून भाजपचा चंदीगडमध्ये महापौर निवडून आणल्याचा आरोप त्यांनी केला.

कुठे सापडल्या ईव्हीएम

उत्तर प्रदेशातील चांडोल येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन आढळल्या. आसाममध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या एका ट्रकमध्ये 300 ईव्हीएम मशीन सापडल्या. भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांमध्ये भाजप पदाधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बहुसंख्य लोक हे गुजराती असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकोट येथील मनसूखभाई हे त्यात आहेत. लोकशाही निवडणुकीत भाजप मनसूख पॅटर्न, चंदीगड पॅटर्न आणू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

यावर टाळले बोलणे

शिवसेना पक्षाचा पॅनकार्ड, टॅनकार्डचा तसेच आयकर संबंधित बाबींचा गैरवापर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केल्याची तक्रार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ही तक्रार करण्यात आल्याचे विचारल्यावर संजय राऊत यांनी त्यावर बोलणे टाळले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.