Eknath Shinde Interview: एकनाथ शिंदेंवर शरद पवार, मनोज जरांगे टीका का करत नाही? मुख्यमंत्री म्हणाले…

महायुतीत अजित पवार यांचा सूर जुळत नाही. त्यामुळे ते निकालानंतर जाऊ शकतात का? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, भाजप-शिवसेनेची विचारधारा एक आहे. अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. परंतु अजित पवार यांची युती राजकीय युती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Eknath Shinde Interview: एकनाथ शिंदेंवर शरद पवार, मनोज जरांगे टीका का करत नाही? मुख्यमंत्री म्हणाले...
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 5:47 PM

Eknath Shinde Exclusive Interview: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु असताना महायुतीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला मुलाखत दिली. ‘टीव्ही ९ मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली. त्यात त्यांनी शरद पवार आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासंदर्भातील माहिती दिली. हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत नाही. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रहस्य सांगितले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील महायुतीमधील एकनाथ शिंदे वगळता सर्व नेत्यांवर आरोप करतात. त्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी सर्वांशी चांगले राहते. माझ्याकडे येणाऱ्या सर्वांची कामे करतो. मी राज्याचा विचार करुन काम करत आहे. मी जमिनीवरचा माणूस आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मग देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार, जरांगे टार्गेट करतात, त्यांना तो मंत्र का देत नाही? यावर मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात ते टिकले होते. त्यानंतर सरकार बदलले. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीने ते घालवले.

हे लहान मुलांसारखे रडतात…

धनुष्यबाण चोरीचा आरोप करतात, उद्धव ठाकरे करतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हे लहान मुलांसारखे रडणे झाले. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. बहुमत आमच्याकडे आहे. मुंबई मनपा इतके वर्ष त्यांच्याकडे होती. मुंबई मनपाला कोणी लुटले. खिचडीमध्ये कोणी पैसे खाल्ले, कोरोनामध्ये कोणी पैसे खाल्ले, खड्ड्यामध्ये कोणी पैसे घेतले, मग यांना काय म्हणावे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

योग्य वेळी मी सर्व उघड करेल? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ती वेळ आली नाही. ते स्वत: बोलून लोकांच्या मनातून उतरत आहे. लोकांना काम पाहिजे, विकास पाहिजे. आमचे काम ते सोपे करत आहे. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देत आहे. मी लोकांमध्ये जात आहे. मी मुख्यमंत्री झालेला त्यांना अजून पचतच नाही. आमची विचारधारा बाळासाहेबांची आहे. ती विचारधारा घेऊन आम्ही पुढे निघालो. त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला आहे.

अजित पवारांसोबत राजकीय युती

महायुतीत अजित पवार यांचा सूर जुळत नाही. त्यामुळे ते निकालानंतर जाऊ शकतात का? या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, भाजप-शिवसेनेची विचारधारा एक आहे. अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. परंतु अजित पवार यांची युती राजकीय युती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. महायुतीला १७० जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.