‘फेमिना मिस इंडिया 2020’ची उपविजेती मान्य सिंहचा परिवहन मंत्र्यांकडून सत्कार

अतिशल प्रतिकूल परिस्थितीत एका रिक्षा चालकाच्या मुलीने यश मिळवणं हे कौतुकास्पद असल्याचं यावेळी अनिल परब म्हणाले.

'फेमिना मिस इंडिया 2020'ची उपविजेती मान्य सिंहचा परिवहन मंत्र्यांकडून सत्कार
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:16 PM

मुंबई : फेमिना मिस इंडिया 2020ची उपविजेती मान्या सिंह हिचा सत्कार गुरुवारी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. अतिशल प्रतिकूल परिस्थितीत एका रिक्षा चालकाच्या मुलीने यश मिळवणं हे कौतुकास्पद असल्याचं यावेळी अनिल परब म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मान्या सिंह हिच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या. (Manya Singh felicitated by Transport Minister Anil Parab)

मुलांच्या शिक्षणाचा खर्च रिक्षा युनियन उचलते. युनियनने आतापर्यंत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या मुलांचा खर्च उचलला आहे. VLCC फेमिना मिस इंडिया 2020 या स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या मान्या सिंह हिला युनियनद्वारे आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तर आयुष्यात मेहनतीनेच फळ नक्की मिळतं, असे सांगून मंत्रिमहोदयांनी केलेल्या सन्मानाबाबत मान्या सिंह आणि तिच्या वडिलांनी परिवहनमंत्र्यांचे आभार मानले.

सोशल मीडियावर मान्याचीच चर्चा

VLCC फेमिना मिस इंडिया 2020 ची उपविजेता ठरलेल्या मान्य सिंहचं मिस इंडिया होण्याचं स्वप्न जरी पूर्ण झालं नसलं तरी सध्या प्रत्येकाच्या तोंडी फक्त तिचं नाव आहे. मान्याचा मिस इंडिया उपविजेतेपदापर्यंता प्रवास खुप थक्क करणारा आहे. मान्या सिंह ही उत्तर प्रदेशमधील एका रिक्षाचालकाची मुलगी आहे. मिस इंडिया २०२० च्या स्पर्धेत ती उपविजेती ठरली. ‘मिस वर्ल्ड २०१७’ ची विजेती मानुषी छिल्लर हिनेही मान्याच्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर तिच्याबद्दल लिहिताने मानुषीने लिहिले की, ‘काचेचं छप्पर अखेर तुटलं.’

कसा आहे मान्याचा जीवन प्रवास?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या मान्याच्या मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, ‘मी आणि माझ्या कुटुंबाने बर्‍याच रात्री उपाशी पोटी आणि झोपेशिवाय घालवल्या आहेत. मी अनेक दुपार कित्येक मैल चालले आहे. एवढंच नाही तर माझं रक्त, घाम आणि अश्रू यांनी मला हा विजय मिळवून दिला आहे. रिक्षाचालकाची मुलगी असल्याने मला शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही कारण मी किशोरवयीन वयातच नोकरी करायला लागले.’

मान्या पुढे म्हणाली की, ‘मला पुस्तकांची आवड होती. पण नशिबाने कधी साथ दिली नाही. माझ्या आई- वडिलांचे काही दागिने गाहण ठेवले ज्याने मी माझी परीक्षेची फी भरू शकले आणि पदवी मिळवू शकले. मला मदत करण्यासाठी माझ्या आई- वडिलांनी खूप त्रास सहन केला.’

इतर बातम्या :

Sooryavanshi : रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटासाठी रिलीजचा मुहूर्त मिळेना!

प्रभासच्या ‘या’ चित्रपटाच्या एका सीनसाठी मोजले तब्बल इतके कोटी!

Manya Singh felicitated by Transport Minister Anil Parab

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.