घणसोलीत 5 मजली इमारतीला भीषण आग, 10-12 दुचाकी जळून खाक, रहिवाशांना घातपाताचा संशय
नवी मुंबईतील घणसोली गावातील बेकरी मागे असलेल्या अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली.
नवी मुंबई : घणसोली गावातील 5 मजली इमारतीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली (Fire Breaks At Ghansoli Ankal Smriti Apartment). या घटनेत आगीत 10 ते 12 मोटर सायकल जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही कुठली दुर्घटना नसून घातपात असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे (Fire Breaks At Ghansoli Ankal Smriti Apartment).
नवी मुंबईतील घणसोली गावातील बेकरी मागे असलेल्या अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचं मोठं नुकसान झालं आहे. यात तळमजल्यावर पार्किंगध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.
या इमारतीच्या शेजाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलानं स्पष्ट केलं. काही समाजकंटकानी जाणीवपूर्वक केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
आज पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी या इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकल पार्किंगच्या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीची झळ पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या समाजसेवक गणेश सकपाळ यांच्या फ्लॅटपर्यंत पोहोचली. त्याच्या फ्लॅटने पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर आगीचे तांडव पाहायला मिळाले.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत या आगीची झळ पोहोचली. दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्याने साखर झोपेत असणारे फ्लॅटमधील रहिवाशी खडबडून जागे झाले आणि त्यांची एकच धावपळ उडाली.
त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि शेजाऱ्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इमारतीत राहणाऱ्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मुंबईतील साकीनाका भागात गोदामाला भीषण आग, आजूबाजूच्या झोपडपट्टीत आग पसरलीhttps://t.co/GJhWxg1APE #Mumbai #Fire
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
Fire Breaks At Ghansoli Ankal Smriti Apartment
संबंधित बातम्या :
मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग, चार दुकानं जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही