AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fire break out in Humsafar Express | चालत्या हमसफर एक्सप्रेसला अचानक भीषण आग, प्रचंड खळबळ, पाहा घटनेचा Live Video

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात हमसफर एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीचा व्हिडीओ समोर आलाय. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले.

Fire break out in Humsafar Express | चालत्या हमसफर एक्सप्रेसला अचानक भीषण आग, प्रचंड खळबळ, पाहा घटनेचा Live Video
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 5:09 PM

वलसाड | 23 सप्टेंबर 2023 : गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून खूप मोठी बातमी समोर आली आहे. तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानक आणि श्री गंगानगर रेल्वे स्थानक दरम्यान हमसफर एक्सप्रेसला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर ट्रेनमधून धुरांचे मोठे लोळ बाहेर पडू लागले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ट्रेनच्या जनरेटर कोचमध्ये ही आग लागली. त्यानंतर ही आग आख्या रेल्वेच्या डब्ब्यात धुमसली. त्यानंतर या रेल्वे डब्ब्याच्या बाजूला असणाऱ्या डब्ब्यांमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी पोलीस, सुरक्षा पथक पोहोचलं आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

ट्रेनला आग लागल्यानंतर स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केलाय. संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आगाची नेमकी घटना का घडली? ट्रेन प्रवासासाठी निघाली तेव्हा सुरक्षेची काळजी घेतली गेली नव्हती का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. ही आग दुसऱ्या प्रवाशी डब्ब्यांमध्ये धुमसली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पण सुदैवाने प्रवासी सुखरुप आहेत.

ट्रेनला नियोजित मार्गाला रवाना केलं जाईल

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमीत ठाकूर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आग लागलेल्या डब्ब्याला ट्रेनपासून दूर केलं जाईल. त्यानंतर लगेच हमसफर एक्सप्रेसला तिच्या नियोजित मार्गाला रवाना केलं जाईल. सध्या तरी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

याआधी गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या मदुरै रेल्वे स्थानकावर रामेश्वरला जाणाऱ्या रेल्वे गाडीला आग लागली होती. लखनऊ येथून रामेश्वरला जाणाऱ्या भारत पर्यटक ट्रेनला 26 ऑगस्टला आग लागली होती. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता गुजराच्या वलसाड जिल्ह्यात रेल्वेला आग लागल्याची घटना घडलीय.

नदीत पाणी वाहेल किंवा..., मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
नदीत पाणी वाहेल किंवा..., मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच....
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.