लालबागमध्ये गणेश गल्लीत आगीचा भडका, एका महिलेचा मृत्यू, तर 9 जणांची प्रकृती गंभीर
लालबामधील गणेश गल्लीत मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 62 वर्षीय महिलेचा मृत्य़ू झाला आहे. (Fire Mumbai Lalbaug)

मुंबई : लालबामधील गणेश गल्लीत मोठी आग लागल्याची (Lalbaug Fire) घटना घडली आहे. या आगीत 62 वर्षीय महिलेचा मृत्य़ू झाला आहे. तर आगीत होरपळल्याने एकूण 9 जणांची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. (fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (6 डिसेंबर) लालबागमधील गणेश गल्लीतील साराभाई इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. मेट्रोपॉलिटन फायर ब्रिगेडने (MFB) आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ही आग लेव्हल 1 ची असल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घडनास्थळी पोहोचल्या.
एका महिलेचा मृत्यू, 9 जण गंभीर
दरम्यान, सुशिला बांगरे (Sushila Bangre) या महिलेचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकूण 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. लालबागमधील गणेश गल्लीतील साराभाई या इमारतीमध्ये आग लागल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळलेल्या बांगरे या महिलेस नागरिकांनी केईएम रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र, जास्त प्रमाणात होरपळल्याने या मिहलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉ. बांगर (Dr. Bangar) यांनी दुजोरा दिला आहे. (fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)
यावेळी केईएम रुग्णालयात एकूण अकरा जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर, बाकीच्या 6 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 4 जणांवर मसिना रुग्णालयात (Masina hospital) उपचार सरु आहेत. या चारही जणांची प्रकृती गंभीर असाल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?
बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण
(fire broke out in mumbai lalbaug one dead nine serious)