AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?

Amazing love Story : नेहमी राजकीय फटकेबाजी करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने प्रेमाच्या प्रदेशात केलेली मुशाफिरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 'प्रेम हे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं' असा निशाणा साधत कोकणातील बड्या नेत्याने त्याची अनोखी प्रेमकथा एका कार्यक्रमात सांगितली.

'आधी पटवलं मग केलं लग्न...', शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?
एका लग्नाची अनोखी कथाImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 15, 2025 | 9:37 AM
Share

कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत असले तरी आतून फणसासारखे गोड आहेत. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून अनेकांना हादरा दिला. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील बड्या नेत्यांना घाम फोडला. त्यांच्या राजकीय फटकेबाजीचे त्यांचे विरोधक सुद्धा स्तुती करतात. भरतशेठ यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला.

आधी पटवलं अन् मग लग्न केलं

रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी गोरेगाव शहरांमध्ये भरत गोगावले यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्यांनी आपल्या खास अंदाजात त्याचे प्रेम आणि नंतर लग्नाचा किस्सा सांगितला. आधी पटवलं अन् मग लग्न केलं असे ते म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या विधानाची एकच चर्चा आता रंगली आहे.

ते म्हणाले की, मुंबईत जाऊन केले. पण वडील गावी आहेत. घरची जबाबदारी आहे. मी पत्नीला सांगितलं की आपल्याला गावाला जावं लागेल. मुंबईहून शेती करायला गावी आलो. मात्र गावी जाऊन तिने तेवढीच साथ दिली. भात लावण्यापासून ते काढण्यापर्य़ंत मळणी करण्यापासून सगळं केलं म्हणून आज सुखाचे दिवस बघतोय. पत्नीने पण मला तेवढी साथ दिली, असे कौतुक भरत गोगावले यांनी केले. तिच्या खंबीर साथीमुळे आपला संसाराचा प्रवास सुखाचा झाला असे ते म्हणाले. त्यांच्या या किस्साची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

भरतशेठ गोगावले यांच्या या अनोख्या प्रेमकथेमुळे राजकारणातील एक हळवा कोपरा सुद्धा समोर आला. त्यांनी यावेळी पत्नीने दिलेल्या खंबीर साथीचा आवर्जून उल्लेख केला. तिच्या मदतीमुळे आपल्याला सुखाचे दिवस आल्याचे ते म्हणाले. त्यांनी प्रेमाचा आणि लग्नाचा किस्सा सांगितला. ते कुणबी समाज सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.