CM Eknath Shinde: पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी, गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..राजसाहेब

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की- राज्यात गणेशोत्सवामुळे आनदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतो. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती.

CM Eknath Shinde: पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी, गणपतीचे घेतले दर्शन, म्हणाले..राजसाहेब
मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या निवासस्थानीImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 5:52 PM

मुंबई – गणेशोत्सव कालपासून सुरु झाला आहे. यानिमित्ताने राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणेशाच्या दर्शनासाठी जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हेही कालपासून ठाणे आणि मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते, उद्योगपतींच्या घरी गणेश दर्शनासाठी फिरताना पाहायला मिळत आहेत. सकाळी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी गणेश दर्शन केल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. आगामी काळातील युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

राज ठाकरेंशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा

भेटीत राजकीय चर्चा झाली नाही- मुख्यमंत्री

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की- राज्यात गणेशोत्सवामुळे आनदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतो. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती. ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि गणरायाच्या दर्शनासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत राजकीय चर्चाच झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी घेतले गणपतीचे दर्शन

जुन्या आठवणींना उजाळा- एकनाथ शिंदे

या भेटीत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणी चर्चेत निघाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज ठाकरे आणि आपण बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात काम केलेले आहे. राज यांनीही त्यावेळी शिवसेनेत राज्यात काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. या भेटीत राजकारणावर चर्चा झाली नाी, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ही भेट नव्या राजकारणाची नांदी आहे का, या प्रश्नावर,  भेटीत राजकीय चर्चाच झाली नसल्याने ही नव्या राजकारणाची नांदी कशी ठरेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.

हे सुद्धा वाचा

ही भेट का महत्त्वाची?

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. त्यात विनोद तावडे, आशिष शेलार यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांत सत्ताधारी आणि मनसे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानण्यात येते आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.