Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थिर सरकारसाठी मोलाचा सल्ला, खातेवाटपाबाबत नेमकं काय म्हणाले चव्हाण?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, खातेवाटप करताना फक्त एकनाथ शिंदेच एकटे नसून त्यांच्यासोबत असलेले भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थिर सरकारसाठी मोलाचा सल्ला, खातेवाटपाबाबत नेमकं काय म्हणाले चव्हाण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप करताना माजी मुख्यमंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:13 PM

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  (Former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी एकनाथ शिंदे यांना एक सबुरीचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shide ) सरकारमध्ये आता जेव्हा खाते वाटप होईल त्यावेळी मात्र त्यांच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात ज्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सत्ता बदल घडवून आणला त्या मुख्यमंत्री शिंदे यांनाचा आता खातेवाटप करताना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काटेरी मुकुटापाठीमागचा संघर्ष कसा करावा लागणार हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले असले तरी त्या पाठीमागे असलेले राजकारण, भाजपची ध्येयधोरणं आणि देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री होणे या निर्णयावर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी आता स्थिर सरकार आणण्यासाठी, खातेवाटपबाबत काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सहकारी आमदारांना नाराजीचा सामना

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर आमदारांचे नाराजी नाट्य आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर राहणार की जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष असले तरी त्या आमदारांना नाराजीचा सामना हा करावाच लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

खातेवाटप करताना काळजी घ्या

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, खातेवाटप करताना फक्त एकनाथ शिंदेच एकटे नसून त्यांच्यासोबत असलेले भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेतून बंड केले आहे, त्या आमदारांना आता खातेवाटप करताना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप करताना काळजी घ्या असा सल्लाही त्यानी त्यांना दिला आहे. महाविकास आघाडीतीलच काही मंत्री आता बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्री पद आणि एकाच भागात द्यावं लागणाऱ्या मंत्रिपदामुळेही वाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.