“मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही”; उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात विरोधकांना सुनावलं

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीचा मुद्दाही उपस्थित केला. जो भाजप पक्ष आमच्या निवडणुकीवरून टीका करतो त्याच भाजपला लोकशाही मान्य नसल्याची गंभीर टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मी भाजपला सोडलय, हिंदुत्वाला सोडलं नाही; उद्धव ठाकरे यांनी एकाच वाक्यात विरोधकांना सुनावलं
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 6:34 PM

मुंबईः शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकर यांनी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधत पत्रकार परिषदेत शिंदे गटावर तोफ डागला. शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं आहे. उत्तर भारतीयांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.

मुंबई  महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधला गेल्याने भविष्यात ठाकरे गटाला याचा काय फायदा होणार ते येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, मी भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला सोडले नाही या शब्दात त्यांनी सुनावले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावरवर युतीच्या गोष्टी होत असल्याने भविष्यात सोबत राहाल तर सर्व काही देऊ असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे गेला असला तरी तुम्ही तुमचे चिन्हे घ्या आणि मर्द असाल आणि तुमच्यात हिम्मत असेल तर मैदानात या अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाबरोबर शड्डू ठोकला आहे.

ज्या पद्धतीने शिंदे गट आणि भाजप ठाकरे गटावर टीका करत आहे. निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवडणूक लढवली असल्याचा आरोप केला जात आहे.

मात्र भाजपनेही काय केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच फोटोचा वापर करावा लागतो. त्यावेळी यांचे राजकारण कुठे जाते असा सवालही त्यांनी यावेळी केला.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीचा मुद्दाही उपस्थित केला. जो भाजप पक्ष आमच्या निवडणुकीवरून टीका करतो त्याच भाजपला लोकशाही मान्य नसल्याची गंभीर टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपप्रमाणे आम्ही कधीच आपापसात लढाई लढवली नाही. मात्र अशी कटकारस्थानं भाजपने केली असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली.

हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपला आणि शिंदे गटाला छेडले आहे. आताच्या काळात जागा झालेला हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या भाजपने केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

भाजप ज्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत असते त्याच वेळी ते हिजाबचाही मुद्दा उपस्थित करतात. काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरे में था तर आता भाजपच्या काळात मात्र हिंदू धोक्यात आला आहे अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

Non Stop LIVE Update
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.