अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती, मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
यानुसार सामान्य प्रशासन विभागाने गृहमंत्र्यांच्या चौकशीबाबतचा आदेश जारी केला आहे. (Anil Deshmukh Inquiry)
मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. (former Justices of Mumbai High Court Inquiry Home Minister Anil Deshmukh)
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्र लिक होणे, याबाबत राज्य सरकारमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याबाबत लवकरच चौकशी आयोग नियुक्त केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली होती.
यानुसार सामान्य प्रशासन विभागाने गृहमंत्र्यांच्या चौकशीबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही समिती सहा महिन्यांत शासनाला अहवाल सादर करणार आहे. (former Justices of Mumbai High Court Inquiry Home Minister Anil Deshmukh)
न्यायमूर्ती कैलास चांदीवाल याची माहिती
- न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे मूळचे औरंगाबादचे आहेत
- त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात साडेसहा वर्षे न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.
- सध्या ते महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.
- तसेच रेराच्या अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती होते.
- शिर्डी संस्थानच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.
परमबीर सिंगांचे आरोप काय?
परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. (Trupti desai comment on Parambir Singh letter)
फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो, असं सिंग यांनी म्हटलं होतं.
अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सगळं काही षडयंत्र असल्याचं म्हटंलय. “सिगं यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. सिंग यांनी आरोप सिद्ध करावेत,” असे थेट आव्हान देत देशमुख यांंनी सिंग यांच्यावर अब्रुनुकसाणीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिलीय. (former Justices of Mumbai High Court Inquiry Home Minister Anil Deshmukh)
संबंधित बातम्या :
परमबीर सिंगांकडून तगडा वकील मैदानात, 100 कोटींच्या टार्गेटवर हायकोर्टात मोठी सुनावणी