Shivsena: शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उद्धव ठाकरेंचा निरोप; उद्या होणार भेट
शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त छापून आल्यानंतर हे वृत्त अनावधानाने छापून आल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर सामनातून हकालपट्टीचे वृत्त छापून आल्यानंतर शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी केली नसून ते शिवसेनेचे नेते असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मुंबईः राज्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापलेले असतानाच शिवसेनेच्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adhalrao Patil) यांना शिवसेनेतून हकालपट्टी (Expulsion from ShivSena) केल्याचे वृत्त सामनामधून आले, त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत असतानाच या निर्णयामुळे शिवसेनेनेला ती कारवाई ती कारवाई मागे घेत असल्याचे जाहीर करत पक्षप्रमुख त्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आज शिवाजीराव आढळराव पाटील यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचा निरोप आल्याने त्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
उद्धव ठाकरेंचा निरोप
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त छापून आल्यानंतर अनेकांना त्याचा धक्का बसला होता. त्याबाबतीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्यालाही शिवसेनेच्या या निर्णयामुळे आपल्यालाही धक्का बसला होता. आपल्यावर का कारवाई करण्यात आल्याचे आपल्याला माहिती नाही असंह त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर झालेली कारवाई मागे घेतल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेच्या या कारवाईनंतर आणि त्यांच्यावर झालेली कारवाई मागे घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांना निरोप दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
भेटीसाठी मातोश्रीवर बोलावलं
माजी खासदार आणि शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेतून हकालपट्टी केल्य पत्र काढण्यात आले होते. मात्र त्यांच्यावरील या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्या पत्रावर प्रतक्रिया व्यक्त करताना शिवाजीराव पाटील यांनी सांगितले की, अगोदर कारवाईच पत्र निघाले असले तरी त्यानंतर आपल्याला उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी मातोश्रीवर बोलवले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जि.प. सदस्यांनाही भेटीचं निमंत्रण
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेने कारवाईचे पत्र काढले होते. त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवले असल्याचे माजी खासदार पाटील यांनीच सांगितले होते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे शिवसेनेबद्दल उलटसुलट चर्चा करण्यात येत होती. शिवसेनेच्या या पत्रामुळे शिवसेनेचे आणि माजी खासदार पाटील यांचेही कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनाही भेटीचं निमंत्रण देण्यात आले.
पक्षातून हकालपट्टी केल्याचं निघालं होतं पत्र
शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त छापून आले होते. त्यानंतर ते शिवसेनेतच असल्याचे शिवसेनेनं पत्रातून स्पष्ट केले. सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
कारवाई मागे घेण्यात आली होती
शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त छापून आल्यानंतर हे वृत्त अनावधानाने छापून आल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर सामनातून हकालपट्टीचे वृत्त छापून आल्यानंतर शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी केली नसून ते शिवसेनेचे नेते असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
उद्या उद्धव ठाकरे आणि शिवाजी आढळरावांची होणार भेट
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे वृत्त छापून आले. त्या वृत्ताने पाटील यांना ज्याप्रकारे धक्का बसला, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या आणि पाटील यांच्या कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर मात्र शिवसेनेने हे वृत्त मागे घेत माजी खासदार पाटील यांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
…म्हणून झाली कारवाईचं वृत्त
शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असंही कॅप्शन लिहिले होते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता ही कारवाई मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.