मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन, साताऱ्यात अंत्यसंस्कार

न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती (Dhananjay Jadhav Dies of Heart Attack)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन, साताऱ्यात अंत्यसंस्कार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 9:11 AM

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Former Mumbai CP) डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव (Dhananjay Jadhav) यांचे निधन झाले. मंगळवार (30 मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. (Former Mumbai Police Commissioner Dhananjay Jadhav Dies of Heart Attack)

नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धनंजय जाधव यांची कारकीर्द

धनंजय जाधव यांचा जन्म 1947 मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले

धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन 1973 मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं.

मुंबई पोलीस आयुक्तपदाचीही धुरा

काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर 2007 मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली.

राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल 1992 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन धनंजय जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला होता.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह आऊट, आता होमगार्डची जबाबदारी!

पोलीस दलातलं पॉवरफुल पोस्टिंग ते साईडलाईन, मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचा इतिहास

(Former Mumbai Police Commissioner Dhananjay Jadhav Dies of Heart Attack)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.