AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांनी दिलेला इशारा खरा ठरला, 4 अपघात, वेळ एकच!

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना सल्ला दिला होता. पण हा सल्ला त्यांनी पाळला नाही.

अजित पवार यांनी दिलेला इशारा खरा ठरला, 4 अपघात, वेळ एकच!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 11:50 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचा परळीत भीषण अपघात झालाय. अपघातात मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. पण मुंडेंच्या अपघाताच्या निमित्तानं रात्री होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आधी विनायक मेटे, मग जयकुमार गोरे, त्यानंतर रिषभ पंत आणि आता धनंजय मुंडेंचा अपघात. या सर्व अपघातात एक साम्य आहे.

धनंजय मुंडेंच्या यांच्या अपघातग्रस्त गाडीची अवस्था पाहिल्यानंतर अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात झाला. धनंजय मुंडेंच्या मते, परळी शहरातल्या आझाद चौकातल्या सर्कलला ही गाडी धडकली. अपघाताची वेळ रात्री साडेबाराची होती. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याच माहिती आहे. अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागलाय. धनंजय मुंडेंना पहिल्यांदा अॅम्ब्युलन्सनं परळीतून लातूरला नेण्यात आलं. आणि लातूरमधून त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला होता. हा अपघातही पहाटे 3 च्या सुमारास झाला होता. पुणे-फलटण रस्त्यावरच्या पुलावरुन गोरेंची गाडी नदीपात्रात गेली होती. या अपघातातून जयकुमार गोरे थोडक्यात बचावले होते. त्यानंतर क्रिकेटपटू रिषभ पंतचाही भीषण अपघात झाला होता. गाडीचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली होती.

रिषभ पंतच्या अपघातानंतर शिखर धवननं पंतला दिलेला सल्ला व्हायरल झाला होता. आणि आता अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंना दिलेला सल्ला व्हायरल होतोय.

विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू, जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात, रिषभ पंतचा अॅक्सिडेंट आणि आता धनंजय मुंडेंच्या गाडीची चौकातल्या सर्कलला धडक. या चारही अपघातांमागे एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे अपघाताची वेळ.

हे सर्व अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाले आहेत. त्यामुळं रात्री-अपरात्री किंवा पहाटे गाडी चालवणं थांबवा. आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची काळजी घ्या.

भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.