रंगमंच कामगारांच्या लॉकडाऊन मदतनिधीमध्ये घोटाळ्याचा आरोप, कामगार संघटना आणि नाट्यसमूह ग्रुपमध्ये कलगीतुरा

रंगमंच कामगारांच्या मदतनिधीमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप कामगार संघाने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे (Fraud in Workers relief fund allegations).

रंगमंच कामगारांच्या लॉकडाऊन मदतनिधीमध्ये घोटाळ्याचा आरोप, कामगार संघटना आणि नाट्यसमूह ग्रुपमध्ये कलगीतुरा
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 7:02 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांच्या हातातील काम गेल्यानं त्यांच्या मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. यात रंगमंच कामगारांचाही समावेश आहे. मात्र, रंगमंच कामगारांच्या याच मदतनिधीमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप रंगमंच कामगार संघटनेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे (Fraud in Workers relief fund allegations). यावेळी रंगमंच कामगार संघटनेने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या वादग्रस्त विधानाचाही निषेध केला. प्रशांत दामले यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर दारुची दुकानं बंद असल्यामुळे कुणी पैशाचा दुरुपयोग करणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावर संघटनेने आक्षेप घेतला आहे.

एकूण 777 कामगार असताना केवळ 275 कामगारांनाच मदत का करण्यात आली? असाही प्रश्न कामगार संघटनेने विचारला आहे. अमेरिकेतील काही महाराष्ट्रीय संघटनांनी लॉकडाऊनमध्ये कामगारांसाठी सढळ हाताने मदत केली होती. आता या वादामुळे त्या संघटनाही मराठी नाट्य समूहास जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. या वादामुळे मराठी नाट्यसृष्टीत आता दोन गट पडले आहेत. मात्र, दुसरीकडे मदत गोळा करणाऱ्या नाट्य समूह गटाने कुणी तरी रंगमंच कामगारांना भडकावत असल्याचा आरोप केला आहे.

या सर्व वादात ऐन लॉकडाऊच्या काळात या रंगमंच कामगारांची मात्र ओढाताण होते आहे. दिड महिन्यांपासून इंडस्ट्री ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांनी हा वाद बाजूला ठेवून मदत करण्याची विनंती केली आहे. मराठी नाटक समूहानेही मदतनिधीच्या घोळाबाबत झालेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ज्यांना नोकरी किंवा इतर व्यवसाय आहेत त्यांचा विचार नंतर करु. आधी जे कामगार केवळ नाटकावर अवलंबून आहेत त्यांचा विचार केला आहे. कोणीतरी कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न करतंय, अशी भूमिका मराठी नाटक समुहाने घेतली आहे. यावेळी त्यांनी प्रशांत दामलेंनी केलेलं वक्तव्यवर स्पष्टीकरण दिलं आहे.

नाट्य समुहाने म्हटलं आहे, “प्रशांत दामले यांनी ते वक्तव्य मस्करीत केलं होतं. त्यांचा कुणालाही हिणवण्याचा हेतू नव्हता. प्रशांत दामलेंची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. सगळ्यात आधी प्रशांत दामलेंनी मदत केली होती याचा विसर पडलेला दिसतोय. वाढत्या मदतनिधीतील रक्कम बघून काही जणांचे डोळे फिरले आहेत.”

नाट्य समुहाने रंगमंच कामगार संघटनेच्या नावाने पैसै मागितल्याचाही नाट्य समूहावर आरोप झाला आहे. मात्र, नाट्य समूह ग्रुपने सगळे आरोप फेटाळले आहेत. या वादावर बोलताना मराठी नाट्य समुहाचे प्रवक्ते आशिर्वाद मराठे म्हणाले, “काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमचं स्पष्टीकरण दिलंय. प्रशांत दामलेंची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा प्रशांत दामले यांनी लगेचच प्रत्येकी 10,000 रुपये मदत केली होती. हे लक्षात‌ घेतलं पाहिजे. त्यामुळे या संकटसमयी संभ्रमावस्था निर्माण होईल असं कोणीही वागू नये.”

हे सगळं गैरसमजातून झालं आहे. आमचं नाट्य समूह ग्रुपशी बोलणं सुरु आहे. लवकरच यावर तोडगा निघेल, असं मत रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ये यांन व्यक्त केलं आहे.

Fraud in Workers relief fund allegations

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.