VIDEO | 15 ऑगस्टपासून सामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू

लोकल पाससाठी अॅपवर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील.

VIDEO | 15 ऑगस्टपासून सामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू
15 ऑगस्टपासून सामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 9:21 PM

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. स्वातंत्र्य दिनापासून लोकल सुरु, पहिल्या टप्प्यात ज्यांनी दोन डोस घेतलेत आणि डोस घेतल्यानंतर ज्यांना 14 दिवस झाले आहेत. लोकल पाससाठी अॅपवर अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. कोरोना निर्बंध, तिसरी लाट, तसेच राज्यात नुकताच आलेला पूर या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. (From August 15, ordinary Mumbaikars will be able to travel by local, but the conditions apply)

कार्यालयीन वेळेची विभागणी करण्याचे आवाहन

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यूआर कोड असतील. जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा. तसेच कार्यालयीन वेळेची विभागणी करण्याचे आवाहन कार्यालयांना केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. आपणा सर्वास माहीतच आहे की, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरी देखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.

संबंधित बातम्या

चिपळूण, महाडसाठी मुख्यमंत्र्यांचा दीर्घकालीन प्लॅन, धोकादायक वस्त्यांपासून ते पुराच्या पाण्यापर्यंत काय काय करणार?

Pune Unlock : व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता! काय सुरु, काय बंद?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.