Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhota Rajan : छोटा राजन याला मोठा दिलासा; या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, दाऊदशी कनेक्शन

Gangster Chhota Rajan News : गँगस्टर छोटा राजन याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याची एका गुन्ह्यात निर्दोष सुटका केली. हे प्रकरण दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन आहे.

Chhota Rajan : छोटा राजन याला मोठा दिलासा; या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता, दाऊदशी कनेक्शन
छोटा राजनला दिलासाImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 10:04 AM

Chhota Rajan Acquitted : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या 2011 च्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात बंद आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत (MCOCA) विशेष न्याय‍धीश ए. एम. पाटील यांनी राजनची प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.

17 मे 2011 रोजी दक्षिण मुंबईत आरिफ अबुनाकर सय्यद नावाच्या व्यक्तीवर दोन आरोपींनी गोळीबार केला होता. आरिफ सय्यद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर होता. या प्रकरणात छोटा राजनवर खुनाचा आरोप करण्यात आला होता. जर त्याची इतर कोणत्याही प्रकरणात गरज नसेल तर त्याची तात्काळ मुक्तता करावी, असा निकाल कोर्टाने दिला. मात्र पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राजनला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

वर्ष 2011 मध्ये झाली होती हत्या

हे सुद्धा वाचा

दक्षिण मुंबईत 17 मे 2011 रोजी दोन लोकांनी आरिफ अबुनाकर सैय्यद या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. सैय्यद हा फरार गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा लहान भाऊ इकबाल हसन शेख इब्राहिम सेख कासकर याचा चालक आणि अंगरक्षक होता.

ज्योतिर्मय डे खून प्रकरणात तुरुंगातच

पोलिसांनुसार, ही हत्या छोटा राजन याच्या इशार्‍यावरून करण्यात आली होती. राजनवर भारतीय दंड संहिता आणि मकोका, शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत खून आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या प्रकरणात राजन हा तुरुंगातच राहणार आहे. राजनवर इतर ही अनेक गुन्ह्यात खटले दाखल आहेत.

छोटा राजन याचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये त्याचे मोठे नाव होते. राजन याचा जन्म मुंबईतील चेंबूर येथील टिळकनगरात झाला होता. तो कधीकाळी दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा होता. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. 2015 मध्ये त्याला इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्यात आले. तेव्हापासून तो तुरूंगात आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.