Corona : कोरोनाच्या लढ्यात गणेश मंडळांचा मदतीचा हात, मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत
मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळे सरसावली आहेत.
मुंबई : मुंबईत साधारण 12 हजारांच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे (Ganpati Mandal Help CM Fund) आहेत. शहरातील गणेशोत्सव मंडळे उत्सवासोबत वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतात. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर किंवा देशावर संकटे आले त्यावेळी सार्वजनिक गणेशमंडळे मदतीला धावून आली आहेत. देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटकाळीही ही गणेशोत्सव मंडळं मदतीला (Ganpati Mandal Help CM Fund) समोर आली आहेत.
कोरोनाचे सावट आता देशासह महाराष्ट्रावर देखील आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळे सरसावली आहेत. याशिवाय रक्तदान शिबिर, विभागात निर्जंतुकीकरण यासारखे उपक्रम देखील मंडळे राबवित आहेत (Ganpati Mandal Help CM Fund).
गणेशोत्सव मंडळे आणि त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला केलेली मदत :
1. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (मुंबईचा राजा) – 5 लाख रुपये
2. आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (अंधेरीचा राजा) – 5,01,111 रुपये
3. शिवडी मध्य विभाग गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा) – 51 हजार रुपये
4. बाल मित्र मंडळ, ग्रँट रोड – 50 हजार रुपये
5. वरळीचा महाराजा – 51 हजार रुपये
6. उमरखाडी सार्वजनिक नवरात्री आणि गणेशोत्सव मंडळ – 1 लाख रुपये
7. आय सी कॉलनी गणेशोत्सव मंडळ, बोरिवली – 25 हजार रुपये
राज्यात कोरोनाचे 635 रुग्ण
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 635 वर येऊन पोहोचली आहे . या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाचे राज्यात कुठे किती रुग्ण?
- मुंबई – 377
- पुणे (शहर व ग्रामीण) – 82
- सांगली – 25
- ठाणे मंडळ – 77
- नागपूर – 17
- अहमदनगर – 17
- यवतमाळ – 4
- लातूर – 8
- बुलडाणा – 5
- सातारा – 3
- औरंगाबाद – 3
- उस्मानाबाद – 3
- कोल्हापूर – 2
- रत्नागिरी – 2
- जळगाव – 2
- सिंधुदुर्ग – 1
- गोंदिया – 1
- नाशिक – 1
- वाशीम – 1
- अमरावती – 1
- हिंगोली – 1
- इतर राज्य (गुजरात) – 1
Ganpati Mandal Help CM Fund