धक्कादायक… कळव्यात रुग्णालयाच्या आवारातच मुलीचा विनयभंग, संपकरी डॉक्टरांनी नराधमाला चोपले

देशभरात कोलकाता येथील महिला डॉक्टरची हत्या झाल्याचे प्रकरणी संताप व्यक्त होत असताना ठाण्यातील कळवा येथील पालिका रुग्णालयाच्या उद्यानात एका दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला संपकरी डॉक्टरांनी बेदम चोप दिल्याचे उघडकीस आले आहे.

धक्कादायक... कळव्यात रुग्णालयाच्या आवारातच मुलीचा विनयभंग, संपकरी डॉक्टरांनी नराधमाला चोपले
crime
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 2:29 PM

एकीकडे कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कारातून निघृण हत्या झालेली असताना आता ठाणे महानगर पालिकेच्या कळवा येथील रुग्णालयाच्या आवारात एका नराधमाने दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीच्या नातेवाईकांच्या सर्तकेने पुढील अनर्थ टळला असून या रुग्णाचे नातेवाईक आणि संपकरी डॉक्टरांना या नराधमाला बेदम चोपल्याची घटना उघडकीस आली आहेय

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर या नराधमास रुग्णाचे नातलग आणि डॉक्टरांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. प्रदीप शेळके (४२) असे या नराधमाचे नाव असुन एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

आपल्या आईसोबत कळवा रुग्णालयात आलेली अकरा वर्षीय पिडीत मुलगी रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्यावेळी नराधम प्रदीप याने त्या मुलीला जवळच्या उद्यानात नेले. तेथे तो मुलीशी अश्लिल चाळे करीत असताना हा प्रकार एका रुग्णाच्या नातेवाईकाने पाहीला. या रुग्णाच्या नातेवाईकाने या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चोप देत ताब्यात घेतले. तसेच या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनी आरोपी प्रदीप याला अटक केली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.