महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे येऊ नये, ग्लोबल पॅगोडा आणि महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
‘कोविड – 19’ या संसर्गजन्य आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता 5 ते 7 डिसेंबर 2020 दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन रविवारी (6 डिसेंबर 2020) आहे. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे मोठ्या संख्येने अनुयायी आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येथे येतात. मात्र, ‘कोविड – 19’ या संसर्गजन्य आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून 5 ते 7 डिसेंबर 2020 दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे (Gobal Pagoda is closed for 3 days amid Corona Virus infection risk0.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी 5 ते 7 डिसेंबर 2020 दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये. तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असं आवाहन महानगरपालिका उपायुक्त विश्वास शंकरवार आणि ‘ग्लोबल पॅगोडा’च्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे केलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर – मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं. उपायुक्त (परिमंडळ – 7) विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, ‘ग्लोबल पॅगोडा’चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) एस. डी. वडके, वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस. एम. नारकर, पदनिर्देशित अधिकारी गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’चे कर्मचारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान ‘कोविड – 19’चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी 5 डिसेंबर 2020 ते 7 डिसेंबर 2020 या 3 दिवशी ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
कोरोनामुळे 4,00,000 नाविक समुद्रात अडकले, मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आवाहन
एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन
Gobal Pagoda is closed for 3 days amid Corona Virus infection risk