AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला

पाणी वापरावर नियंत्रण आणण्याकरता दुरेक्ष दर पद्धतीनुसार होणाऱ्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळून लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांना दिलासा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 7:27 PM

मुंबई : मुंबईकरांची पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे. पाणी वापरावर नियंत्रण आणण्याकरता दुरेक्ष दर पद्धतीनुसार होणाऱ्या पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळून लावल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तसंच दरवर्षी पाणीदरात होणारी 8 टक्के वाढही कोरोनामुळं होणार नसल्याचं पालिका प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. (good news Standing Committee rejects proposal to increase water tariff in mumbai)

पाणी पुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार, प्रति व्यक्ती दररोज 150 लिटर इतका पाण्याचा वापर हवा होता. परंतु, मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा 150 लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या जास्तीच्या पाण्याला दुरेक्ष दर पद्धतीनुसार जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. ओसी नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणाऱ्या पाणीदरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती.

सध्या दरडोई 150 लिटर पाणी वापरणाऱ्यांना 1 हजार लिटरसाठी 5.22 रूपये दर आहे. तर 150 ते 200 लिटर पाणी वापरणाऱ्यांसाठी 10.44 रूपये इतका दर आहे. ज्याचा प्रस्तावीत दर 10.44 रूपये इतका होता. तर 200 ते 250 लिटरकरता 15.66 वरून 26.10 रूपये इतका आणि 250 हून अधिक लिटरकरता 20.88 वरून 31.32 रूपये इतका दर प्रस्तावित होता. परंतु स्थायी समितीत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं ही दरवाढ होणार नाही.

दरम्यान, मुंबईकरांना पाणीपट्टी दरवाढीला सामोरे जावे लागण्याची जाण्याची शक्यता असताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे, स्थायी समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे मुंबईकरांवर महापालिका आयुक्तांनी लादलेली कंबरडे मोडणारी दरवाढ नामंजूर करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

इतर बातम्या –

सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा

‘उद्धव ठाकरे भेटण्यासाठी टाळटाळ करत आहेत’; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुलीचा आरोप

(good news Standing Committee rejects proposal to increase water tariff in mumbai)

पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.