AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा; पडळकरांनी वडेट्टीवारांना ललकारले

खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. (gopichand padalkar reply to vijay wadettiwars defamation case warning)

खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा; पडळकरांनी वडेट्टीवारांना ललकारले
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:45 AM

मुंबई: खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल 50 कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. (gopichand padalkar reply to vijay wadettiwars defamation case warning)

गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असे खुले आवाहन पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.

वडेट्टीवार यांनी काय म्हटलं होतं?

विजय वडेट्टीवार यांनी काल पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

तर राजकारण सोडेल

पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

सुपारी घेऊन काम करतात

इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला चंद्रपुरातील एक माणूस केंद्रात मंत्री होता. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. संघर्षातून मी शिकलो. चळवळीतून घडलो. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला.

पडळकरांचे आरोप काय?

पडळकरांनी वडेट्टीवारांवर घणाघाती आरोप केले होते. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहेत. तसेच दारुच्या व्यवसायात त्यांची भागिदारी आहे, असे आरोप पडळकर यांनी केले होते. त्यामुळे वडेट्टीवार प्रचंड संतापले होते. (gopichand padalkar reply to vijay wadettiwars defamation case warning)

संबंधित बातम्या:

पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र, उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या, 6 वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल, फडणवीस, राणे नेमकं काय म्हणाले?

(gopichand padalkar reply to vijay wadettiwars defamation case warning)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.