AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन, अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज फोन केला. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची, तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

BREAKING | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन, अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त
| Updated on: Nov 09, 2020 | 1:28 PM
Share

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आणि अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अर्णव गोस्वामी यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. (Governor Bhagat Singh Koshyari calls Home Minister Anil Deshmukh, expresses concern over Arnav Goswami’s safety and health)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज फोन केला. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची, तसंच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. राज्यपालांनी यापूर्वीही देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अलिबागवरुन तळोजा कारागृहात आणण्यात आलं. तेव्हा अर्णव यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.  भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केल्याची माहिती मिळत आहे.

गोस्वामी अटक प्रकरणात ‘A समरी रिपोर्ट’ कळीचा मुद्दा

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी गोस्वामी यांच्या वकिलाने या प्रकरणात A समरी रिपोर्ट दाखल झाल्याचं सांगितलं. यामुळे हे प्रकरण पुन्हा सुरु करण्याचा आणि अर्णव गोस्वामी यांना अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचा दावा केला. तसेच ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. यानंतर सरकारी वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात कोणत्याही प्रकरणात पोलिसांकडून दाखल केल्या जाणाऱ्या A, B, C अशा तिन्ही समरी रिपोर्टमधील फरकच स्पष्ट केला.

संबंधित बातम्या:

मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राम कदमांचे खुले आव्हान

अर्णव गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू; राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा

अर्णव गोस्वामींची सुटका आणि पोलिसांचं निलंबन करा, राम कदम यांचं उपोषण

Governor Bhagat Singh Koshyari calls Home Minister Anil Deshmukh

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.