1993 Mumbai Blast : 1993च्या मुंबई बॉम्बब्लास्टप्रकरणी चौघांना अटक! गुजरात ATS ची मोठी कारवाई

Mumbai Bomb Blast Update : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

1993 Mumbai Blast : 1993च्या मुंबई  बॉम्बब्लास्टप्रकरणी चौघांना अटक! गुजरात ATS ची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:00 PM

मुंबई : गुजरात एटीएसने (Gujrat ATS) 1993 साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी (1993 Mumbai Serial Blast) चौघांना अटक केली आहे. एएनआयनं याबाबचं वृत्त दिलंय. आता अटक करण्यात आलेल्या चौघांचीही कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून काय नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला मोठं यश आलं होतं. मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपीला 4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाचील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकला यूएईतून अटक करण्यात आली होती. 1993 साली मुंबईतीलवेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल 29 वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं होतं.

चौघांना अटक

गुजरात एटीएसने मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी ज्या चौघांना अटक केली, त्यांची नावंही समोर आली आहेत. सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा, युसुफ भटका, अबू बकर अशी चौघांची नावं आहेत.

अटक करण्यात आलेले चौघे कोण?

1993 mumbai blast accused

अटक करण्यात आलेले चौघे कोण?

1993 साली 12 मार्च रोजी मुंबई साखली बॉम्बस्फोट झाले होते. संपूर्ण मुंबईसह देशही या दहशतवादी हल्ल्यानं हादरला होता. जाणून नेमकं या दिवश काय झालं होतं?

पाहा व्हिडीओ :

1993च्या बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याला यूएईतून अटक करण्यात आली असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं जात होतं. अखेर त्याच्या मुसक्या आवळ्यात आल्या असल्याचं गुजरात एटीएसनं केलेल्या कारवाईतून स्पष्ट झालंय. 2019मध्ये खरंतर बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आलीय.

कोण आहे अबू बकर?

अबू बकर यांचं पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. अबू हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्यानं आखाती देशांमधून सोनं, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे.

1997 मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. अबूनं दुबईतीलच एका इराणी मुलीशी लग्न केलंय. अबू बकरचे दुबईतील अनेक व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचंही सांगितलं जातं.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.