Gunaratna Sadavarte : सदावर्तेंवर तिसऱ्यांदा वकिल बदलण्याची वेळ, न्यायलयीन कोठडीत रवानगी, कोर्टातला युक्तीवाद वाचलात?
आंदोलकांना भडकावल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले. त्यानंतर आज त्यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे नाव चांगलेच चर्चेत आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आंदोलकांना भडकावल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले. त्यानंतर आज त्यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. मात्र आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर गुणरत्न सदावर्तेंचा ताबा हा सातारा पोलिसांनी मागितल्या त्यांना हा ताबा देण्यात आला आहे. कारण साताऱ्यातही सदावर्तेंविरोधात एक गुन्हा दाखल झाला आहे. सदावर्तेंना अटक झाल्यापासून कोर्टातल्या युक्तीवादासाठी सदावर्तेवर तीन वकील बदलण्याची वेळ आली. तसेच आज कोर्टातही अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
आतापर्यंत तीन वकीलांकडून युक्तीवाद
सुरूवातीला कोर्टात सदावर्तेंची बाजू कोर्टात वकील महेश वासवानी यांनी मांडली. तर त्यानंतर वकील गिरीश कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी सदावर्ते यांच्यासाठी कोर्टात युक्तीवाद केला. आज मात्र सदावर्तेंकडून मृणमयी कुलकर्णी लढताना दिसून आल्या. सरकारी पक्षाकडून मात्र सुरूवातीपासून सरकारी वकील प्रदीप घरत ही खिंड लढवत आहेत.
सरकारी वकीलाचा युक्तीवाद
- या प्रकरणात तीन मुख्य आरोपींवर फोकस ठेवण्यात आला आहे. त्यात पहिलं नाव हे गुणरत्न सदावर्ते यांचं आहे. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी हेही या केसमधील महत्वाचे आरोपी आहे. यांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे कोर्टाला सांगण्यात आले.
- या आरोपींनी पैशाच्या लोभातून हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. यात मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करण्यात आला आहे. हे कोट्यवधी रुपये कुठे गेले. याचा पोलिसांना शोध घ्यावा लागेल.
- यात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीला म्हणजेच वकील जयश्री पाटील यांनाही सहआरोपी बनवण्यात आले आहे. तर यात काही कलमं सुद्ध वाढवण्यात आली आहे. 409 आणि 406 या नव्या कलमांचा समावेश करण्यात आहे.
- 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते 2.50 दरम्या गणरत्न सदावर्ते यांच्या घरी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काय झालं? याचाही पोलिसांना छडा लावायचा आहे, असे कोर्टाला सांगण्यात आले.
- या प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंनी एकूण किती रक्कम गोळा केली याची माहिती मिळवायची आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कोणतीही पावती का दिली गेली नाही. याचाही शोध घ्याचा आहे. तसेच नागपूच्या व्यक्तीला पकडायचे आहे, त्याला लवकरच पकडू असाही युक्तीवाद करण्यात आला.
सदावर्तेंच्या वकीलाचा युक्तीवाद
- जयश्री पाटील यांचं नावं एफआयआरमध्ये नाही त्यामुळे त्यांना फरार म्हणणं चुकीचे ठरेल. तसेच त्यांना विनाकरण गोवण्याची गरज नाही.
- तपासात पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही.सदावर्तेंचा मोबाईल व इतर काही गोष्टी पोलिसांकडे आहे, त्यातून तपास
- करता येऊ शकेल.
- आर्थिक व्यवहाराचा कोर्टात उल्लेख करण्याची गरज नाही, कारण गुन्हा हा आंदोलनाप्रकरणी दाखल झाला आहे. तसेच आर्थिक व्यवहाराप्रकरणी कोणत्याही कर्मचाऱ्याने तक्रार केली नाही.
Cm Uddhav Thackeray मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचा कामाचा धडाका, कोस्टल रोडचाही घेतला आढावा