Gunratna Sadavarte: सदावर्तेंचे कारनामे; 250 डेपोंतून गोळा केले पैसे, संशयितांची कबुली काय?

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नुकतीच अटक केलेल्या मगर याने महत्वाची भूमिका बजावल्याचे समोर येतेय. शिवाय संदीप गोडबोले हा पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईला आला होता. त्याने जयश्री पाटीलसह इतरांच्या उस्थितीमध्ये झालेल्या सात एप्रिलच्या बैठकीला हजेरीही लावली होती, असे वकिलांनी न्यायालयात सांगितले.

Gunratna Sadavarte: सदावर्तेंचे कारनामे; 250 डेपोंतून गोळा केले पैसे, संशयितांची कबुली काय?
Gunaratna Sadarte
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 9:36 AM

मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेले प्रमुख संशयित आणि एसटी आंदोलनाचे उत्तरार्धातले नेते अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे एकेक कारनामे आता समोर येत आहेत. त्यांनी राज्यभरातील तब्बल अडीचशे एसटी डेपोंमधून पैसे गोळा केले आहेत, अशी माहिती सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak Attack) प्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी न्यायालयात दिलीय. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झालीय. दुसरीकडे या हल्लाप्रकरणात पोलिसांनी अजित मगर नावाच्या आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. आतापर्यंत 117 जणांवर कारवाई करण्यात आलीय. यातले मुख्य संशयित संदीप गोडबले, अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात नुकतीच अटक केलेल्या मगर याने महत्वाची भूमिका बजावल्याचे समोर येतेय. शिवाय संदीप गोडबोले हा पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईला आला होता. त्याने जयश्री पाटीलसह इतरांच्या उस्थितीमध्ये झालेल्या सात एप्रिलच्या बैठकीला हजेरीही लावली होती, असे वकिलांनी न्यायालयात सांगितले.

पैसे गोळा करायला लावले

शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणातील संशयित अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपण पैसे घेतले नसल्याचे सांगितले. मात्र, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून आपल्याला पैसे गोळा लावले. विशेष म्हणजे यात गोडबोले सहभागी होता, अशी कबुली त्यांनी दिलीय. त्यामुळे सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेलाय.

एक फॉर्म तयार केला…

पैसे गोळा करण्यासाठी सदावर्ते यांनी एक फॉर्म तयार केला होता. तो व्हॉटसअॅपवर फिरवण्यात आला. अॅफिडेव्हिट फाइल करायचे असल्याचे सांगत राज्यभरातील अडीचशे डेपोतल्या कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले. प्रत्येकाकडून साधरणतः 270 रुपये घेण्यात आले. या पैशातून सदावर्ते यांनी कारसह इतर मालमत्तांची खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

ती माझी फी होती…

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाने न्यायालयात हे आरोप फोटाळून लावले. आपण कोणाचीही फसवणूक केलेली नाही. माझ्या अशिलाने मला पैसे दिले. त्याची चौकशी करणे चुकीचे आहे. मी ऐंशी लाख गोळा केले, असे म्हणत असतील. मात्र, ती माझी फी होती. असा दावा सदावर्ते यांच्या वकिलाने कोर्टात केल्याचे समजते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.