Gunratna Sadavarte : होय, एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, गुणरत्न सदावर्तेची कबूली, मर्जीनं पैसे घेतल्याचाही दावा

शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने सर्व समीकरण बदलू टाकलं आहे. या आंदोलनात सदावर्तेंचा हात आसल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांनी चार दिवस पोलीस कोठडीतही काढले. मात्र याचदरम्यान कोर्टातल्या युक्तीवादात रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.

Gunratna Sadavarte : होय, एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, गुणरत्न सदावर्तेची कबूली, मर्जीनं पैसे घेतल्याचाही दावा
गुणरत्न सदावर्तेंची पैसे घेतल्याची कबुली, सरकारी वकिलांचा दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 4:02 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे वादात सापडले आहेत. सुरूवातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे (St Worker Protest) नेतृत्व करणारे फायब्रँड वकील अशी गुणरत्न सदावर्तेंची ओळख होती. मात्र आता तीच ओळख बदलत चाललीय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. कारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने सर्व समीकरण बदलू टाकलं आहे. या आंदोलनात सदावर्तेंचा हात आसल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांनी चार दिवस पोलीस कोठडीतही काढले. मात्र याचदरम्यान कोर्टातल्या युक्तीवादात रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. रोज नवे आरोप होत आहेत. सुरूवातील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप झाला. गुणरत्न सदावर्ते यांनी या पैशाचं काय केलं? याचा शोध पोलिसांकडून सुरू झाला. त्यानंतर सदावर्तेंच्या घरात चक्क पैसे मोजण्याचे सापडल्याची माहिती आली. आणि आतार तर सादवर्ते यांनीच एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

सरकारी वकीलांचा दावा काय?

कोर्टात सरकारकडून गुणरत्न सदावर्तेविरोधात सरकारी वकील प्रदीप घरत युक्तीवाद करत आहेत. कोर्टातल्या युक्तीवादारम्यान सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दावा केला आहे की, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा नवं ट्विस्ट आलं आहे. होय, एस.टी.कर्मचाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले, मात्र ते त्यांच्या मर्जीने घेतले अशी कबुली सदावर्तेंनी दिल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंच्या या कबुलीने आणखी अडचणी वाढणार का? हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच सरकारी वकीलांचा दावा किती खरा आहे, ते तर तपासाअंतीच कळेल.

मालमत्ता घेतल्याचाही आरोप

एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे लाटून गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक मालमत्ता घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यात परळमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून 60 लाखांची जागा घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच याच पैशातून सदावर्ते यांनी भायखळ्यातही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. गुणरत्न सदावर्ते यांनी याच पैशातून नवीन गाडी खरेदी केल्याचेही सरकारी वकीलांनी कोर्टातील युक्तीवादादरम्यान म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्यात खळबळ माजली आहे. सदावर्ते यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम झालं, त्यांना विलीनीकरणाचे अमिष दिले गेले. आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून कष्टकरी म्हणत पैसे उकळले, हे सर्व बाहेर येईलच, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, मात्र आता ताबा कोल्हापूर पोलिसांकडे! प्रकरण काय?

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीतल्या अतिक्रणविरोधी मोहिमेवर वाद, डाव्या नेत्या बृंदा करात मैदानात, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतरही कारवाई

Gunratna Sadavarte: एकीकडे उसासा, दुसरीकडे दिलासा! सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंना जामीन मंजूर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.