उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवलेला नाही, गुणरत्न सदावर्तेंचं अनिल परब यांना चॅलेंज

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या दाव्यांना अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उच्च न्यायालयानं संप बेकायदेशीर ठरवलेला नाही, गुणरत्न सदावर्तेंचं अनिल परब यांना चॅलेंज
अनिल परब गुणरत्न सदावर्ते
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 6:00 PM

मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या दाव्यांना अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवला असल्याचं म्हटलं होतं. त्यावर सदावर्ते यांनी हा संप मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेला नाही, असं म्हटलं. संप करणं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे. अनिल परब यांचा खोटारपडेपणा सुरु आहे. आदित्य ठाकरे यांच्या सारख्या युवा मंत्र्यानं यामध्ये लक्ष घालावं, अशी अपेक्षा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.

संप बेकायदेशीर ठरवलेला नाही

डंके की चोट पर मुंबई उच्च न्यायालयाने कामगारांचा संप हे बेकायदेशीर  ठरविलेला नाहीच, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. आपल्या हक्क अधिकरासाठी लढायचा, संपचा अधिकार संविधानाने दिला आहे. एक मंत्री म्हणून अनिल परब तुमच्याकडूंन खोटारडेपणा किंवा चुकीची माहिती पसरवण्याची अपेक्षा नाही, असं सदावर्ते म्हणाले.

आमची एकही मागणी मान्य केली नाही

गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र सरकारनं आमच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या नसल्याचा दावा केला. पागराचा एरियर्स किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळाले तर ती मेहरबानी नाही. ते आमच्या हक्काचे पैसे आहेत. एसटी क्रमचाऱ्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणा संदर्भात आहे. अनिल परब तुम्ही या मागणीचा काहीच विचार केला नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. बाकी आम्ही जे काम केल्याच्या बदल्यात जे देताय तो आमचा हक्क आहे. उलट आमच्या आर्यन पाटील नावाच्या सांगलीच्या कंडक्टर तणावाने हार्ट अटॅकमुळे आपले प्राण गमावले आहेत. पाटील यांनी या लढ्यात शहादत दिली आहे. अनेक दिवसा पासून तो लोकांना विचारत होता क़ाय झाले, या तणावात त्यांचा जीव गेला असं सदावर्ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा

तरुण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समोर आले पाहिजे,त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली. मला असं वाटतंय की मुख्यमंत्री याबाबत कॉल घेतील आणि योग्य चर्चा करून योग्य ते न्यायलयात मांडतील, असं सदावर्ते यांनी म्हटलं.

न्यायालयाला तुम्हाला दंड करायला लावू

अनिल परब यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याबद्दलची याचिका दाखल केलीय. यावर सदावर्ते तुमची अवमान नोटीस तर सोडा तुमच्या याचिकेचं काय होतं ते पण आम्ही पाहणार आहोत, असं सदावर्ते म्हणाले. न्यायलयात तुम्ही सांगितलं होतं की कंटेम्प्ट नोटीस पाठवा मात्र न्यायालयाने आम्हाला उत्तर दाखल करायला सांगितलं आहे, असं सदावर्ते यांनी अनिल परब यांना म्हटलं आहे. न्यायालयाने आम्हाला नोटीस पाठवणे किंवा इतर कार्रवाईचा आदेश दिलेला नाही. तुमची याचिका कायद्याला धरुन नाही हे आम्ही कोर्टात दाखवून देऊ आणि तुम्हाला दंड करायला लावू, असं आव्हान सदावर्ते यांनी अनिल परब यांना दिलं आहे.

इतर बातम्या:

‘बऱ्याच कामगारांना कामावर येण्याची इच्छा, त्यांना संरक्षण पुरवणार’, अनिल परबांचा दावा

तुमच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही?, अनिल परबांचा भाजपला सवाल; कामगारांना संप मागे घेण्याचं आवाहन

Gunratan Sadavarte gave challenge to Anil Parab claim of st strike is illegal and appeal to Aaditya Thackeray to solve strike

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....