सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश, न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सरकारला महत्त्वाचा आदेश दिला.

सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश, न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 3:59 PM

अक्षय कुडकेलवार, Tv9 मराठी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. त्यांच्यासोबत हजारो मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. गाड्या, बैलगाड्यांसह अनेक मराठे नागरीक हे मुंबईच्या दिशेला येत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सदावर्ते यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे यांना परवानगी दिली तर आपण कोर्टात त्या परवानगीला चॅलेंज देऊ, असं सदावर्ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत तरी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आझाद मैदानासह कुठेही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आंदोलनासाठी अर्ज केला आहे. पण पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. अशाप्रकारे जमाव एकवटून एकत्र येत आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. या प्रकरणी कलम 302 म्हणजे खुनासारखे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतरवली सराटीत लाठीचार्ज दरम्यान 29 पोलीस जखमी झाले होते. त्याचा दाखला सदावर्ते यांच्याकडून कोर्टात देण्यात आला. यावेळी कोर्टाच्या वकिलांनी महत्त्वाचे निर्देश दिले.

न्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. “सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी”, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले. “मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे”, असे आदेश कोर्टाने दिले.

कोर्टात नेमका युक्तिवाद काय?

सदावर्ते – मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कुठलीही परवानगी नसताना हे सर्व सुरु आहे. गाड्या, ट्रॅक्टर, बैलगाड्यासह लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत येत आहेत. जर परवानगी दिली तरी आम्ही त्याला चॅलेंज करु. मात्र परवानगी नसताना हे सर्व घडत आहे. २९ पोलीस अधिकारी गंभीर जखमी आहेत. कलम ३०२ सारख्या तीन घटना घडल्या, अजूनही कुणाचीही नाव एफआयआरमध्ये नाही.

महाधिवक्ता – सरकारकडे आंदोलनासाठी कुठल्याही अधिकृत मागणीचे पत्र आले नाही. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण शहराच्या महत्त्वाच्या भागात आंदोलन करण्याबाबत पुनर्विचार करण्याची सरकारची भूमिका आहे.

सदावर्ते – सरकारमध्ये दोन गट पडले आहेत, अशी परिस्थिती शाहीन बाग वेळी झाली होती.

सदावर्तेंच्या युक्तिवादाला महाधिवक्त्यांचा दुजोरा

सदावर्ते – पंढरपूरमध्ये एका नॉन मराठा तरुणाची हत्या हा देखील हे आंदोलन मोठं करण्यासाठी केलेल्या कृत्याचा भाग आहे. हत्या करुन फाशी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अशी फाशी लागत नाही. (सदावर्तेंकडून प्रात्याक्षिक करुन दाखवण्याचा प्रयत्न)

महाधिवक्ता – आमची आंदोलकांना सूचना आहे की त्यांनी मुंबईच्या बाहेर कुठेतरी आंदोलन करावे

महाधिवक्ता – सर्व लोकांनी मोठ्या संख्येने मुंईत येण्याचा प्रयत्न केला तर मुंबईची परिस्थितीत बिघडू शकेल. आम्ही पुन्हा सांगतोय त्यांना आंदोलनाचा अधिकार आहेच मात्र त्यांनी जिथे मुबलक जागा आहे तिथे आंदोलन करावे. पोलिसांनी देखील तशी जागा त्यांना उपलब्ध करुन द्यावी.

न्यायमूर्ती – कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची काय गरज आहे?

महाधिवक्ता – उद्या आमच्याकडून एखादी अॅक्शन घेतली गेली आणि त्याचा विपरीत परिणाम पडला तर जबाबदारी कुणाची?

सदावर्ते – यापूर्वी मराठा आरक्षण असंविधानिक ठरवे होते, तरीही या असंविधानिक आरक्षणासाठी आंदोलनाची गरज काय? (विविध आंदोलनाबाबात सुप्रीम कोर्टाने कुठल्या नियम अटी घातल्या आहे त्याचो सदावर्तेकडून वाचन)

न्यायमूर्ती : सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी

महाधिवक्ता: ती खबरदारी आम्ही घेतोय मात्र ते तितक शक्य होत नाही आहे. आम्हाला आंदोलनाच्या परवानगीसाठी रितसर पत्रच आले नाही महाधिवक्त्यांचा पुनरुच्चार

न्यायमूर्ती : मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होन्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे.

Non Stop LIVE Update
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...