टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : एसटी बँक सदावर्तेंनी जिंकली, पवार पुरस्कृत आणि पडळकर पॅनेलचा धुव्वा,
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सर्वच जागावर विजय मिळालाय. गेल्या 15 वर्षांपासून या बँकेवर स्टेट कर्मचारी संघटनेचे वर्चस्व होते. स्टेट कर्मचारी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुरस्कृत मानली जाते
मुंबई : एसटी बँकेची निवडणूक सदावर्तेंच्या पॅनलनं जिंकली. शरद पवार पुरस्कृत पॅनेल आणि गोपीचंद पडळकरांच्या पॅनलचाही सदावर्तेंच्या पॅनलने धुव्वा उडवलाय. एसटी सहकारी बँक निवडणुकीत सदावर्ते पॅनलला सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळालाय.
पॅनल विजय झाल्यानंतर सदावर्तेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे पोस्टर झळकावले. 23 जून रोजी एसटी बँकेची निवडणूक पार पडली. राज्यभरातल्या 281 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली.
पाहा व्हिडीओ-
गेल्या 15 वर्षापासून या बँकेवर स्टेट कर्मचारी संघटनेचे वर्चस्व होतं. स्टेट कर्मचारी संघटना ही शरद पवार पुरस्कृत मानली जाते. या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला सर्व 19 जागांवर विजय मिळालाय. आमदार गोपीचंद पडळकर यांचं पॅनलही या निवडणुकीत होतं. पण त्या पॅनलला यश मिळालं नाही. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेचं पॅनलचाही या निवडणुकीत धुव्वा उडालाय.
सदावर्तेंनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार केला होता. पण सदावर्तेंच्या प्रचारात एसटी सोडून इतर सगळे मुद्दे होते. एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा उदोउदो, आणि पवारांवर टीका हाच सदावर्तेंचा एककलमी कार्यक्रम होता.
जवळपास 15 वर्षांपासून एसटी बँकेवर कामगार संघटनेचं वर्चस्व होतं. मात्र, एसटी आंदोलनानंतर या निवडणुकीला एक वेगळी दिशा मिळाली. एसटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पडळकर आणि खोत यांच्या पॅनलला देखील सपशेल अपयश आलं.